प्रबोधनकार श्री. पुंडलिक पिंपळके यांना रोटरी क्लब मार्फत जीवनगौरव पुरस्कार प्रदान. त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे (संपादक -:-...
प्रबोधनकार श्री. पुंडलिक पिंपळके यांना रोटरी क्लब मार्फत जीवनगौरव पुरस्कार प्रदान.
त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी:जयराम बदादे
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लेखन, साहित्य, कला, उद्योजकता, समाजसेवा, समाजप्रबोधन अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना दरवर्षी रोटरी क्लबद्वारे विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते
या संस्थेमार्फत दिला जाणारा यंदाचा 'वसंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार' महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार, प्रबोधनकार. श्री पुंडलिक पिंपळके यांना प्रदान करण्यात आला.
नाशिकचे श्री. पुंडलिक पिंपळके पेशाने बँक ऑफ महाराष्ट्रात 'बँक मॅनेजर' असून इतर वेळी ते महाराष्ट्रभर कीर्तनं, प्रवचनं, व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असतात.
लेखक, कवी, संगित विशारद, प्रेरकवक्ते, समाजसेवक, उच्चशिक्षित प्रबोधनकार असलेल्या पुंडलिक पिंपळके यांचा भारताला लाभलेल्या गौरवशाली संत साहित्याचा व तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास आहे. ते आपल्या ज्ञानवैभवातून व आपल्या गोड वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात.
पुरस्कार प्रदानाप्रसंगी सन्मान चिन्ह, पुष्पगूच्छ व रोख पाच हजार रुपये देत सरांचा मान्यवरांच्या तसेच जनसामान्यांच्या उपस्थित गौरव करण्यात आला.
शुद्ध, सात्विक ज्ञानाचा प्रसार करत समाजमनावर आपल्या कर्तुत्वाची छाप पाडून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करत सर समाजाचे हित साधत आहेत. समाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्याची इच्छा त्यांच्या अंतस्त हृदयात झळकतांना दिसते.

No comments