adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रमजान विशेष तणावमुक्त उपासक

  रमजान विशेष तणावमुक्त उपासक जी माणसे ईश्वर (अल्लाह) एक आहे.असे मानत नाहीत,ते नेहमी व्याकुळ आणि त्रस्त असतात.रमजानचा महिना उपासकाला अनेक ईश...

 रमजान विशेष

तणावमुक्त उपासक

जी माणसे ईश्वर (अल्लाह) एक आहे.असे मानत नाहीत,ते नेहमी व्याकुळ आणि त्रस्त असतात.रमजानचा महिना उपासकाला अनेक ईश्वरांच्या गुलामीतून काढून एका ईश्वराच्या सान्निध्यात पोचवितो. त्याचे एकमेव कारण असे की प्रत्येक उपासना करताना ती दिसते. नमाज, हज, दानधर्म

अशा उपासना पार पाडत असताना भौतिक रूपाने त्या दिसून येतात. परंतु उपवास करताना तसे काही दिसून येत नाही. उपवासधारकाचा संबंध थेट अल्लाहबरोबर असल्या कारणाने उपासक तणावमुक्त असतो. त्याला कुणाची तमा राहत नाही, कारण त्याला माहीत आहे,माझ्या या तहानलेपणाचा आणि उपाशीपोटी राहण्याचा मोबदला अल्लाह स्वहस्ते देणार आहे. म्हणून मला कोणाचीच गरज नाही. सतत तीस

दिवस म्हणजे सातशेवीस तास एकच ध्यान बाळगल्याने माणसाला सात्त्विक सवय लागते. प्रत्येक गोष्टीच्या प्राप्तीसाठी फक्त अल्लाहावर अवलंबून राहातो.अल्लाहपर्यंत पोहोचणे सोपे !अल्लाह सर्वांचे सुख-दुःख जाणतो.तुम्ही हाक मारा (अर्थात स्मरण), तो तुमच्या मदतीला नक्कीच येईल. खरे तर, अल्लाहपर्यंत पोहोचणे खूप सोपेआहे. त्याकरिता कोणी गुरू किंवा आश्रयदात्याची आवश्यकता नाही. तो

जगाचा स्वामी, संसाराचा निर्माणकर्ता आणि सर्वांचा पालनकर्ता सतत आपल्या पाठीशी आहे. आवश्यकता आहे केवळ अंत:करणाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याची व त्याच्या निर्मितीची सेवा करण्याची. त्यात मानव सर्वोपरी आहे. तद्नंतर जनावरे, वातावरण, निसर्ग आणि सामाजिक सलोखादेखील अल्लाहच्या भक्तीचाच एक मार्ग आहे. आपण मन:पूर्वक अल्लाहची भक्ती केली तर त्यात आपलेच कल्याण आहे.अल्लाहला आपल्याकडून काहीच नको आहे.

अब्दुल सरदार पटेल

चोपडा, जि. जळगाव

मो.८७६६७४७०९२

No comments