यावल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी. टी. पाटील यांचे निधन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठ...
यावल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी. टी. पाटील यांचे निधन
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे पहिले व माजी प्राचार्य बी.टी. पाटील (वय ८०) यांचे दि २८ मार्च २०२५ रोजी दुःखद निधन झाले. दि १५ ऑगस्ट १९८३ रोजी यावल महाविद्यालयाची स्थापना झाली तेव्हा पहिले प्राचार्य होण्याचा बहुमान पाटील यांना मिळाला होता .प्राचार्य बी. टी. पाटील हे १९८३ ते १९८६ तसेच २००० ते २००५ असे दोन वेळा शिस्तप्रिय प्राचार्य म्हणून महाविद्यालयाचे यशस्वीरीत्या काम पाहिले होते. त्यांना यावल महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे उपप्राचार्य डॉ सुधीर कापडे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. आर डी पवार, डॉ.मयूर सोनवणे, प्रा. मनोज पाटील, प्रा. मुकेश येवले, प्रा.संजीव कदम, प्रा.चिंतामण पाटील, प्रा. राजू तडवी, प्रा.सोनाली पाटील, तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
No comments