दहिगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग - पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील द...
दहिगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग - पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील दहिगाव येथे रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने रात्री मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन , यावल पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाटील नामक व्यक्ती राहणार दहिगाव तालुका यावल यांने आपल्या शेजारीच राहणाऱ्या एका१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ती घरात झोपलेली असतांना रात्री नऊ वाजेच्या सुमारास तिच्या मनाला लज्जा वाटेल असा विनयभंग केल्याबाबतची फिर्याद यावल पोलिसात दाखल झाल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनयभंग झालेल्या मुलीचे वडील आपल्या कुटूंबासोबत घरात झोपले असतांना संशयीत व्यक्ती रात्री ३ वाजेच्या सुमारास घरात घुसून त्याने मुलीचा उजवा हात पकडून लज्जा वाटेल असे कृत करून तिचा विनयभंग केला मुलगीने घाबरून जोराने आरडाओरड केली असता संशयीत आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली व त्याने घरातून पळ काढला मुलीने देवदर्शनाहुन परत आलेल्या तिच्या आईला सदरचा प्रकार सांगीतल्यावर वडिलांना यावरून यावल पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगीकं अपराधा पासुन संरक्षण अधिनियम२०१२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे .
No comments