चोपडा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील प्रामपंचायती वगळून उर्वरीत एकूण 79 ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत निहाय सरपंचआरक्षण सोडत चोपडा प्रतिनिध...
चोपडा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील प्रामपंचायती वगळून उर्वरीत एकूण 79 ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत निहाय सरपंचआरक्षण सोडत
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील प्रामपंचायती वगळून उर्वरीत एकूण 79 ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत निहाय सरपंचआरक्षण सोडत निश्चीत करण्याचाबतची कार्यवाही सोमवार दिनांक 21/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सौ आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील नाटयगृह, नगरपरिषद चोपडा कार्यालय चोपडा येथे आयोजित बैठकीत करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की
मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील क्रमांकः साशा ग्रामप/कावि/2025 दिनांक 15/04/2025 रोजीच्या अधिसुचने नुसार चोपडा तालुक्यातील, या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरीक तसेच सर्व राजकीय पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, यांना या निवेदनाव्दारे जाहीर विनंती करण्यांत येते की, चोपडा तालुक्यातील अनुसुचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून उर्वरीत एकुण 79 ग्रामपंचायती (लासुर, चौगांव, मामलदे, चुंचाळे, मौजे हिंगोणे, मजरे हिंगोणे, गणपुर, भवाळे, गलंगी, वेळोदे, घोडगांव, कुसंबे, विरवाडे, वडती, अंबाडे, वर्डी, माचले, तावसे खुर्द, मंगरुळ, वराड, नागलवाडी, आडगाव, नरवाडे, काजीपुरा, अकुलखेडे, वेले, मजरेहोळ, गरताड, अजंतिसिम, मोहिदे, दगडी बु., अनवर्दे बु., वढोदे, विटनेर, वाळकी, मालखेडे, बुधगांव, अनवर्दे खुर्द, हातेड खुर्द, गलवाडे, हातेड बु. भाई, चहार्डी, विचखेडे, धुपे बु.. घाडवेल, दोंदवाडे, तांदलवाडी, निमगव्हाण, खाचणे, तावसे बु., कुरवेल, धनवाडी, घुमावल बु. खडगाव, गोरगांवले बु. कोळंबा, सनफुले, कठोरे, गोरगांवले खु. भोकरी, सुटकार, वटार, वडगांव बु., अडावद, लोणी, खर्डी, बिडगाव, वरगव्हाण, पंचक, धानोरा प्र.अ., देवगांव, पारगांव, चांदसणी, रुखनखेडे प्र.अ, कमळगांव, पिंप्री, मितवाली, पुनगांव मधुन अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच निश्चीत करण्याबाबतची कार्यवाही दिनांक 21/04/2025 (सोमवार) रोजी सौ. आक्कासाहेब शरदचंद्रिका सुरेश पाटील नाटयगृह, नगरपरिषद चोपडा कार्यालय जवळ ठिक सकाळी 11.00 वाजता सुरु करण्यात येणार आहे.
तसेच उपरोक्त प्रमाणे निश्चीत केलेल्या सरपंच पदांमधुन, महिलांसाठी आरक्षण (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखुन ठेवण्याची कार्यवाही मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांच्या अध्यक्षतेखाली उपरोक्त नमुद दिवशी व ठिकाणी दुपारी 2.00 वाजता सुरु करण्यात येणार आहे. तरी सदरील आरक्षण सोडतीस उपरोक्त ग्रामपंचायतीचे सर्व नागरीक, ग्रामस्थ, राजकीय पक्ष व संघटना पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी उपस्थित रहावे, ही विंनती.असे आव्हान चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे

No comments