घरफोडी करणारा चोर जेरबंद,8 तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अह...
घरफोडी करणारा चोर जेरबंद,8 तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.३):- सारसनगर येथील येवले नगर मध्ये राहणाऱ्या फिर्यादी अंजली संतोष आडिवळे यांच्या राहत्या घरी 3 लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करीत असताना एका संस्थेत आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केलेली आहे कबुली देऊन चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी आठ तोळे वजनाचे (2,61900) रु. दागिने पोलिसांनी आरोपी कडून हस्तगत केले आहे. विकास अंकुश बेरड (रा.येवले नगर सारसनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करीत आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,पोलीस अंमलदार दीपक शिंदे,रवी टकले,प्रमोद लहारे,कांतीलाल चव्हाण यांनी केली आहे.

No comments