शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना नि...
शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नगर (दि.३)- अहिल्यानगर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा आहे आता पूर्णाकृती पुतळा उभारला गेला पाहिजे व अहिल्यानगर शहर हे अण्णाभाऊ साठे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले असल्याने या शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागेचे सुशोभीकरण करून हा पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments