adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुका 82गावांचे सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर

  रावेर तालुका 82गावांचे सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज तहसील कार्यालय रावेर येथी...

 रावेर तालुका 82गावांचे सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज तहसील कार्यालय रावेर येथील सभागृहात तहसीलदार बंडू कापसे नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले यात अनुसुचित जातीसाठी – १३ अनुचित जमातीसाठी - ११ तर ओबीसीसाठी -१५ ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षीत करण्यात आले आहे. तर उर्वरित -४३ ग्रामपंचायत सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहेत.

आरक्षण सोडत खालील प्रमाणे 

अनुसूचित जाती : विवरे खुर्द,कुंभारखेडा, मस्कावद बुद्रुक, मांगी-चूनवाडे, सावखेडा बुद्रुक, पाडले खुर्द, धामोडी, खिरोदा प्र. रावेर, कळमोदा, गहुखेडा, खानापूर, मुंजलवाडी, वाघोदे खुर्द

अनुसूचित जमाती : चिनावल, मस्कावद सीम, भोर, सुगाव, कोचुर बुद्रुक, निरूळ, दोधे, थेरोळे, नेहेता, पुनखेडा, वाघोड

नामाप्र : उटखेडा, सुनोदा, वाघोदा बुद्रुक, कर्जाद, अजनाड-चोरवड, थोरगव्हाण, विवरे बुद्रुक, सिंगत, रणगाव, अहिरवाडी, खिर्डी खुर्द, खिर्डी बुद्रुक, रमजीपूर, वाघाडी, अजंदे,

सर्वसाधारण : रेंभोटा, पुरी-गोलवाडा, गाते, कोचुर खुर्द, गौरखेडा, भोकरी, रायपुर, कोळोदे, केहऱ्हाळा खुर्द, नांदूरखेडा, सावखेडा खुर्द, वडगाव, तासखेडा, भातखेडा, बलवाडी, केहऱ्हाळा बुद्रुक, खिरोदा प्र. यावल, रसलपूर, उदळी बुद्रुक-लूमखेडा, रोझोदा, विटवे, तांदलवाडी, निंबोल, तामसवाडी-बोरखेडा, अंदलवाडी, ऐनपूर, उदळी खुर्द, शिंगाडी, मोरगाव खुर्द, खिरवड, अटवाडे, पातोंडी, मांगलवाडी, सुलवाडी, निंभोरासीम, कांडवेल, शिंदखेडा, बक्षीपूर, मस्कावद खुर्द, मोरगाव बुद्रुक निंभोरा बुद्रुक धुरखेडा सिंगनूर दसनूर आदि गावांचा समावेश आहे 

रावेरचे तहसिलदार ए. बी . कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर आरक्षण सोडणेकामी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी सचिन पाटील, विठोबा पाटील, यासिन तडवी, भुषण कांबळे, यांनी सहकार्य केले.

No comments