२८ एप्रिल पासून सांगवी बुद्रुक येथे निःशुल्क वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन इदू पिंजारी फैजपूर- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रीझे...
२८ एप्रिल पासून सांगवी बुद्रुक येथे निःशुल्क वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
इदू पिंजारी फैजपूर-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रीझेंडूजी महाराज दिव्य दिंडी परंपरा प्रणित वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ज्योती विद्यामंदिर सांगवी बु ll तालुका यावल तसेच श्रीक्षेत्र कुंडलेश्वर बेळी तालुका जळगाव या दोन ठिकाणी दि.२८ एप्रिल २०२५ ते १४ मे २०२५ या कालावधी दरम्यान करण्यात आलेले आहे .सदरचे शिबिर निशुल्क ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये वयोमर्यादा १२ वर्षाच्या पुढील प्रौढांपर्यंत राहील. आजची पिढी व्यसन फॅशन हिंसाचार भ्रष्टाचार इत्यादी कुसंस्काराने ग्रस्त बनत चाललेली आहे. त्यांना कुसंस्कारातून मुक्त करण्यासाठी सुसंस्कार देणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून बालक व तरुण वर्गाची ही भावी पिढी सुशिक्षित संस्कारित घडावी आणि आदर्श समाज व आदर्श राष्ट्र निर्माण व्हावे या व्यापक हेतूने संतांनी दाखवलेल्या मार्गाने म्हणजे वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे वारकरी संस्कार संपन्न शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेनंतर विद्यार्थ्यांनी साहित्य घेऊन शिबिरात हजर व्हावे असे आयोजकांकडून कळवण्यात आलेले आहे .
झेंडूजी महाराज बेळीकर दिव्य पायी दिंडी परंपरेचे मुख्य सेवक हभप भरतजी बाबा पाटील तसेच परंपरेतील समस्त बुवा मंडळी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिराकरता झेंडूची महाराज बेळीकर सेवेकरी परिवार तसेच प्रकाश मंडळ सांगवी बुद्रुक यांचे मोलाचे योगदान लाभत आहे . या शिबिरात परंपरेतील नामवंत कीर्तनकार ,प्रवचनकार, गायक, वादकवृंद,गुणीजन मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे .
शिबिरासाठी नितीन भोळे , दीपक बुवा शेळगावकर, डालेंद्र बुवा असोदेकर ,हरीश अत्तरदे यांच्याशी संपर्क साधावा .या वारकरी भजन प्रशिक्षण शिबिरामध्ये मुख्य भर भजनांतर्गत येणाऱ्या सोप्या चाली, टाळ, मृदंग वादन त्याचप्रमाणे भगवद्गीता अध्याय १२ व १५ संहिता पाठांतर,
हरिपाठ,हनुमान चालीसा, प्रातःसमयीचे श्लोक, वारकरी पावली नृत्य, शारीरिक प्रशिक्षण, व्यायाम, योगासने, प्राणायाम, व्यसनमुक्ती, महापुरुष चरित्र व्याख्यानमालाअशा अनेक विविध विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे . तरी परिसरातील शालेय विद्यार्थी व भक्तिमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

No comments