यावलला शनिवारी श्री बालाजीचा रथोत्सव, खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढणार. आमदारांच्या सुचनेवरून रथोत्सव मार्गाचे डांबरीकरण, पदाधिकाऱ्यां...
यावलला शनिवारी श्री बालाजीचा रथोत्सव, खंडोबाच्या यात्रेत बारा गाड्या ओढणार.
आमदारांच्या सुचनेवरून रथोत्सव मार्गाचे डांबरीकरण, पदाधिकाऱ्यांची पाहणी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : शेकडो वर्षाची पंरपरा असलेला शहरातील श्री बालाजीरथाेत्सव शनीवारी (दि.१२)आयोजित असुन त्या साठीची तयारी पुर्ण झाली आहे. रथाची स्वच्छता व सजावट तसेच रंगरंगोटी करण्यात आली आहे तर नगर पालिका प्रशासना कडून आमदार अमोल जावळे यांच्या सुचनेवरून रथमार्गाची नदीपात्रात स्वच्छता सह शहरातील मार्गात थेट डांबरीकरण करण्यात आले आहे. या मार्गाची भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पाहणी देखील करण्यात आली आहे.तसेच खडकाई नदीजवळील महाराणा प्रताप नगरातील खंडोबा महाराज मंदिराची यात्रा देखील असुन चोपडा रस्त्यावरून बारागाड्या ओढल्या जाणार आहे. तेव्हा नदीपात्रात देखील यात्रे करीता स्वच्छता करण्यात आली आहे. यावल शहराला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. त्यात शहरात श्री बालाजी रथोत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी श्री महर्षी व्यास मंदिरापासुन हडकाई-खडकाई नदी पात्रातुन रथ मिरवणूक निघते. या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक वर्ग येत असतो. सुमारे १२ टन वजनाच्या या रथाला भाविकवर्ग ओढत असतो. तर अतिशय शिताफीने रथाच्या चाकंाना मोगरी लावत कसबपुर्ण रित्या वळविण्यात येत असते. शनीवारी शहरात हा रथोत्सव साजरा होत असुन रथाची किरकोळ दुरूस्तीचे काम पुर्ण करण्यात आले आहे. व रथोत्सवा करीता रथ सज्ज करण्यात आला आहे. तर नगर पालिका प्रशासनास आमदार अमोल जावळे यांनी सुचना करीत रथ मार्गाचे डांबरी करण्या मुख्याधिकारी निशिकांत गवई, अभियंता सत्यम पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
खंडोबाची यात्रा, १२ गाड्या.
शनीवारी श्री हनुमान जयंती निमित्त सालाबादा प्रमाणे चोपडा रस्त्यावरील खंडोबा महाराजांची यात्रा देखील आहे. महाराणा प्रताप नगरातील मंदिरात देखील यात्रे निमित्त भाविक,भक्त दर्शना करीता येतात तर सायंकाळी खडकाई नदीच्या पात्रात यात्रोत्सव असुन चोपडा रस्त्यावरून १२ गाड्या ओढल्या जाणार आहे.
इतिहास असा.
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा कै. पांडूरंग धोंडू देशमुख व सहकार्यांनी सन १९१४ मध्ये रथोत्सव सुरू केला होता.त्या काळात श्री बालाजी महाराजांची प्रतिमा आरूळ असलेला रथ रामजी मिस्त्री विनामुल्य करून दिला होता. पुजारी म्हणुन वासुदेवबाबा बियाणी, राजाभाऊ नागराज, भैय्याजी अग्नीहोत्री नंतर १९७३ ते २००६ या काळात रमेशशास्त्री बयाणी,नारायणराव बयाणी, बलवंत जोशी व २००६ नंतर महेश बयाणी, राजु बयाणी व सुनिल जोशी पुजारी म्हणुन काम पाहत आहे
रथ मार्गाची पाहणी
रथोत्सवच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार शहरातील नदीच्या भागात व शहरात रथ मार्गाची पाहणी भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,व्यंकटेश बारी,मुकेश कोळी,भूषण फेगडे,राहुल बारी,अतुल चौधरी, बबलू घारू, कोमल इंगळे भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.


No comments