बौद्ध जनसंघातर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी मोठा वाघोदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक-:- हेमकांत गायकव...
बौद्ध जनसंघातर्फे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
मोठा वाघोदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बु,ता.रावेर येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती बौद्ध जनसंघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली
सर्वप्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दिलीप इंगळे,विजय झाल्टे व ग्रा.पं. सदस्य महेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. "'महात्मा फुलेंचे योगदान फक्त स्त्रीयांपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचा मुख्य पाया ज्योतीबाबांनी त्याकाळच्या कर्मठ पुण्यात रचला. त्यांनीच सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि "19 फेब्रुवारी 1869" ला जगातील पहिली शिवजयंती साजरी केली तसेच "24 सप्टेंबर 1873" ला स्थापन केलेल्या "सत्यशोधक समाजाच्या" माध्यमातून चळवळीला अधिकचे बळ प्राप्त करून दिले"' असे मत सुत्रसंचालन करीत असतांना अंकुश मेढे यांनी वक्त केले.शेवटी महात्मा फुले यांच्या कार्याला, विचारांना व त्यागाला पुनश्च विनम्र अभिवादन करून करण तायडे यांनी उपस्थितांचे आभार मांडले आणि कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.यावेळी ग्रा.पं.सदस्य सुपडू वाघ,महेंद्र वाघ,करण तायडे, नरेंद्र वाघ,महेंद्र शंकर बोदडे। अमोल वाघ मयूर सपकाळे अतुल वाघ अजय तायडे अक्षय वाघ शेखर भालेराव महेश मासाने व संपूर्ण बौद्ध समाज बांधवांनी सहभाग घेतला

No comments