महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या भोरटेक येथील पोलिस पाटलास केले निंलबीत भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...
महिला ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या भोरटेक येथील पोलिस पाटलास केले निंलबीत
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील भोरटेक येथील पोलीस पाटलाने तालुक्यातील एका ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांचा विनयभंग केला होता. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस पाटलाविरुद्ध गुन्हा दाखल असुन महिला अधिकारी सोबत केलेल्या गैरवर्तना बाबत व त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम अन्वये प्रांताधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
भोरटेक ता. यावल येथील पोलीस पाटील धनराज गोंडू कोळी यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सदर महिला अधिकारी यांचा पाठलाग करणे, त्यांच्या कार्यालयात जावुन शासकीय कामात अटकाव करणे आणि त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत विनयभंग करणे आदी प्रकरणी विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा भोरटेक येथील पोलीस पाटील धनराज कोळी याने केलेला हा प्रकार अतिशय घृणास्पद असल्याने त्यांच्या विरूध्द तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी निलंबनाचा प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठवला होता. त्यानुसार प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सन २००६ च्या शासन निर्णयानुसार कामाच्या ठिकाणी लैगींक सतापणूकीस प्रतिबंध कायद्याअंतर्गत केलेल्या तरतूद नुसार, महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम अन्वये पोलिस पाटील यांना निलंबीत केले आहे तर या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे.-

No comments