मुळ न्हावीचे अमेरिकेत असलेले उच्चशिक्षित पत्नी पाठोपाठ पतीचे ही निधन इदू पिंजारी फैजपूर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) येथील रहिवासी ढेमा त...
मुळ न्हावीचे अमेरिकेत असलेले उच्चशिक्षित पत्नी पाठोपाठ पतीचे ही निधन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
येथील रहिवासी ढेमा तुकाराम महाजन व,सौ. पुष्पा ढेमा महाजन दोघेही पती-पत्नी उच्च शिक्षित माजी मंत्री स्व. दादासाहेब जे टी महाजन ( माजी गृहराज्यमंत्री ) यांचे धाकटे बंधू ढेमा तुकाराम महाजन यांचे प्राथमिक शिक्षण गावातीलच शाळेत तसेच माध्यमिक शिक्षण येथील भारत विद्यालय हायस्कूल मधून घेऊन १९६१ यावर्षी अकरावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाले. त्यानंतर मुंबई येथील व्हि. जे. टी. आय. येथील इंजीनियरिंग शाखेत प्रवेश घेऊन १९६७ यावर्षी बी ई इलेक्ट्रिकल व बी ई मेकॅनिकल चांगल्या मार्कांनी पदवी संपादन केली.पुढे १९७१ यावर्षी अमेरिकेत जाऊन "मास्टर ऑफ कॉम्प्युटर सायन्स "विषयात पदव्युत्तर शिक्षण अमेरिका येथील, ऄ. टी अँड, टी, बेल लॅबस या कंपनीमध्ये ३३ वर्ष नोकरी करून अमेरिकेत स्थायिक झाले. १९६९ यावर्षी यावल तालुक्यातील सांगवी येथील पुष्पा प्रेमचंद चौधरी यांच्याशी विवाहबद्ध झाले,पत्नी सौ.पुष्पा ढेमा महाजन यांनी सुद्धा "असोसिएट सायन्स" ही पदवी वृकडेल कम्युनिटी कॉलेज न्यू जर्सी अमेरिका येथून संपादित केली.
ढेमा तुकाराम महाजन, व सौ. पुष्पा ढेमा महाजन , या दोघांच्या संसार वेलीवर एक मुलगा, व दोन मुली आहेत.मुलगा व दोघे मुली उच्चशिक्षित असून संपूर्ण परिवार हा अमेरिका येथील सॅन होजे कॅलिफोर्निया येथे स्थायिक आहे .घरामध्ये सुनबाई, जावई, नातवंडे, असा गजबजलेला परिवार दि.२२ मार्च या दिवशी सौ.पुष्पा महाजन (वय ७७) यांची प्राणज्योत मालवली. पत्नीच्या मृत्यूचे दुःख सावरत नाही तो वर ढेमा तुकाराम महाजन (वय ८३) यांचे सुद्धा दि. ४ एप्रिल या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.१४ दिवसात पती-पत्नी या दोघांच्या मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघांवर अमेरिका येथील सॅन होजे कॅलिफोर्निया येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.ढेमा तुकाराम महाजन, व पुष्पा ढेमा महाजन हे तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळ न्हावी मार्ग फैजपूर संचलित जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग चे अध्यक्ष शरद महाजन यांचे काका, व काकू, होत.

No comments