adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिजाऊ रथयात्रेत मलकापूर व नांदुरा तालुक्यातील बंधु -भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  जिजाऊ रथयात्रेत मलकापूर व नांदुरा तालुक्यातील बंधु -भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायक...

 जिजाऊ रथयात्रेत मलकापूर व नांदुरा तालुक्यातील बंधु -भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर : मराठा सेवासंघ संचालित जिजाऊ रथयात्रा २०२५ मराठा जोडो अभियानात २० एप्रिल रोजी येणार्‍या रथयात्रेत मलकापूर  व नांदुरा तालुक्यातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी व्हावे , असे आवाहन मलकापूर तालुका जिजाऊ रथयात्रा समन्वयक दिलीपभाऊ देशमुख व नांदुरा तालुका समन्वयक सुभाष पेठकर यांनी केले आहे.

मराठा जोडो अभियानातंर्गत मराठा सेवासंघाच्या वतीने जिजाऊ रथयात्रा २०२५ चे आयोजन करण्यात आले असून २० एप्रिल रोजी रथयात्रा बुलढाणा जिल्ह्यात येणार आहे. सदर यात्रा नांदुरा येथे दुपारी ४ वाजता विश्रामगृह येथे येणार असून तेथून ४.२० वाजता मधुबन चौक, ४.४० वा. गांधीचौक, ४.५० वा. उमंग चौक, ५ वा. छत्रपती शिवराय पुतळा, ५.३० वा. नेताजी सुभााषचंद्र बोस चौक, ५.४० वा. मोठा हनुमान येथून मलकापूरकडे वडी, धानोरा, वाघुडमार्गे प्रस्थान करणार आहे. ६.०० वा. मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या नांदुरा नाक्याजवळील उड्डाणपुला जवळ आगमन होईल. ६.३० वा. सावजीनगर, ६.४० वा. तहसील चौक, ६.५० वा. हनुमान चौक,  ७ वा. तुलसी ज्वेलर्समार्गे जिजाऊ लॉन छत्रपती शिवराय मंगल कार्यालय येथे जाहीर सभा व रथयात्रेचा मुक्काम असणार आहे.तरी सदर रथयात्रेत मलकापूर व नांदुरा तालुक्यातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी व्हावे, असे आवाहन मलकापूर तालुका जिजाऊ रथयात्रा समन्वयक दिलीपभाऊ देशमुख व नांदुरा तालुका जिजाऊ रथयात्रा समन्वयक सुभाष पेठकर यांनी केले आहे.

No comments