adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना व उपासना

  अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना व उपासना  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अह...

 अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना व उपासना 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर - गुड फ्रायडे या पवित्र दिवशी, येशू ख्रिस्ताचे सखोल बलिदान तुम्हाला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रेम, करुणा आणि क्षमा स्वीकारण्यास प्रेरित करो. गुड फ्रायडे सर्वांना आठवण करून देतो की, अंधाराच्या क्षणांमध्येही आशा आणि मुक्ती सहज उपलब्ध असते. तुमचे हृदय शांती आणि कृतज्ञतेने भरून जावो. आपल्या तारणहाराच्या वधस्तंभावरील मृत्युचे स्मरण करताना, आपण त्याला वधस्तंभावर नेणार्या अमर्याद प्रेमावर चिंतन करूया आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्या प्रेमाचे प्रतिबिंब पाडण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

 अहमदनगर पहिली मंडळी (सी.एन.आय.) चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना व उपासना करण्यात आली. यावेळी उत्तम शुक्रवारचा संदेश प्रिस्ट इनचार्ज, चर्च ऑफ होली एंजल्स पुणे येथील रेव्ह.अभिषेक पारकर यांनी दिला. 

  उत्तम शुक्रवार ह्या दिवशी अखिल मानवाच्या कल्याणाकरिता येशू ख्रिस्ताने जे सात शब्द वध स्तंभावरून उच्चारले त्यावर प्रवचन करण्याकरिता पुणे या ठिकाणाहून आदरणीय रेव्ह अभिषेक पारकर यांना पाचरण करण्यात आले होते. सूत्र संचालन रेव्ह. राजकुमारी सिंग यांनी केले. भक्तगणाला प्रभू येशूने जे शब्द वधस्तंभा वर उच्चारीले त्यावर उपदेश केला.यावेळी समाज बांधव चर्चमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच चर्चचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.

No comments