चोपडा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ द्या चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा ...
चोपडा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी बांधवांना शासकीय योजनेचा लाभ द्या
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुका आदिवासी पेसा क्षेत्र असेलेला वसलेला असून,कर्जाने गावातील सबस्टेशन नवनिर्मित अजून पर्यंत रखडीत असलेलं,ते निधी देऊन लवकरात चालू करावे,तसेच आदिवासी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विहीर बोरवेल,पाईप ठिबक,त्याचप्रमाणे,बेरोजगारांसाठी कर्ज,महिलांसाठी,रेशन कार्डधारकांना रेशनधान्य,जातीचे दाखले,असे अनेक,पायाभूत सुविधा पासून आदिवासी हा वंचित राहिलेला आहेत असेच त्या निवेदनात म्हटले गेला आहे,त्याचप्रमाणे चोपडा आदिवासी मुला मुलींचे होस्टेल बाबत,डीबीटी स्कॉलरशिप,संयम,इत्यादी प्रलंबित विषय सुटलेल्या आहे व शासकीय जागा मिळावी या विषयावर देखील आदिवासी विकास मंत्री यांच्या निवासस्थानी चर्चा करण्यात आली.
त्याचप्रमाणे चोपडा तालुक्यातील सर्व पेसा ग्रामपंचायतना ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत नवीन प्रस्ताव मागवून विविध कामे द्यावी अशी ही मागणी केली,आणि आदिवासी वनपट्टे शेती धारकांनी उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागत असून त्या ठिकाणी विशेषता वैयक्तिक विहिरी ही देणे आवश्यक आहे या बैठकीत झाली,त्याचप्रमाणे आदिवासी एकात्मिक प्रकल्प यावल अंतर्गत जे योजना राबविले जातात ते काही लोकांपुरतेच दिले जातात तर काही लोकांना दुजाभाव केला जातो असेही सांगण्यात आली आणि म्हणून अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन ती गावोगावी घेण्यात यावी,तसेच शैक्षणिक आरोग्य,इत्यादी विषयांवर अधिकाऱ्यांना आदेश देऊन जागृतीची कार्यक्रम राबवावे असेही सांगितले.उपस्थित पिंटू पावरा जिल्हा वन हक्क समिती सदस्य जळगांव,प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे,नामा पावरा,मेलाणे,बबलू बारेला कर्जाणे,आदी समाज बांधव उपस्थित होते.वन अधिकार कायदा अंतर्गत उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हास्तरीय प्रलंबित वनदाव्यांची बैठक आदिवासी विकास विभाग प्रकल्प यावल अंतर्गत घेऊन त्याची सुनावणी लवकरात करावी आणि त्यांना योजनेचा लाभ घ्यावा अशी आदिवासी विकास मंत्री यांना विनंती विशेष प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे यांनी केली.

No comments