यावल महाविद्यालयात पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसा...
यावल महाविद्यालयात पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या.
प्रारंभी प्रास्ताविकात डॉ.हेमंत भंगाळे यांनी सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी नेहमीच जागरूक असावे शैक्षणिक प्रगती सक्षम करणे हा महाविद्यालयाचा उद्देश आहे. असे सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी एखादे कौशल्य अवगत केले तरच स्पर्धेच्या युगात टिकू शकतील तसेच मागील नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाला श्रेणी "ब" मिळाली. असे सांगितले. पालकांमधून श्री. यशवंत जासूद भाषणात सांगितले की महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात सुविधा व मार्गदर्शन मिळत आहे. याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी भाषणात सांगितले की, महाविद्यालयाच्या गुणवत्तेचा शैक्षणिक आलेख हा वाढलेला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांशी शैक्षणिक प्रगती विषयी चर्चा करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित करणे याविषयी मार्गदर्शन केले, तसेच महाविद्यालयाला आपल्या सूचना कळवाव्यात असे आवाहन केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एस. पी. कापडे, डॉ.पी. व्ही. पावरा डॉ.आर.डी.पवार, डॉ. मयूर सोनवणे, प्रा.संजीव कदम,प्रा.मनोज पाटील, प्रा. सी. के. पाटील,प्रा. सोनाली पाटील,प्रा.ईश्वर पाटील,प्रा.इमरान खान,श्री. मिलिंद बोरघडे, श्री.प्रमोद कदम, व पालकांमध्ये माजी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, श्री. विजय चौधरी, श्री.जगन्नाथ फेगडे, श्री. विवेक सोनार, श्री.योगेश लावणे, श्री. अनिल पाटील, श्री. संतोष ठाकूर व बहुसंख्य पालक उपस्थित होते. याबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे उप प्राचार्य प्रा.संजय पाटील यांनी मानले.राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.

No comments