आरोग्यम् हॉस्पीटलच्या अवैध बांधकामावर न.प. प्रशासन कारवाई करीत नसल्याने प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी न.प.कार्यालया समोर केले घागर...
आरोग्यम् हॉस्पीटलच्या अवैध बांधकामावर न.प. प्रशासन कारवाई करीत नसल्याने प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी न.प.कार्यालया समोर केले घागर पुजन आंदोलन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- आरोग्यम् हॉस्पीटलच्या बांधकाम धारकाकडून आवश्यक असलेली कुठलीही बांधकाम परवानगी घेण्यात आली नसल्याची तक्रार दि.२७.१२.२०२४ रोजी न.प.मुख्याधिकारी यांचेसह मंत्रालयापर्यंत दाखल केल्या होत्या. या तक्रारीवरून न.प.चे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांनी संबंधित बांधकाम धारकास सदरचे बांधकाम एक महिन्याच्या आत जमीनदोस्त करण्यात यावे, अन्यथा आपणा विरूध्द फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे पत्र (नोटीस) दि.२७.१२.२०२४ रोजीच डॉ.विकेश जैन (शांती आरोग्यम् हॉस्पीटल) मलकापूर यांना दिले होते. या पत्राला चार महिन्याच्या कालावधी उलटत आहे. मात्र तरीही सदरचे बांधकाम हे जैसे थे असेच आहे. तर सदर प्रकरणी न.प.प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने व न.प.तील अधिकारी, कर्मचारी हे संबंधित बांधकाम धारकास पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. तेव्हा येत्या ३० एप्रिलपर्यंत सदर अवैध बांधकामावर कारवाई करण्यात यावी अन्यथा ३० एप्रिल रोजी न.प. कार्यालयात घागर पुंजण्याचे आंदोलन करण्याचा इशारा अजय टप यांनी न.प. मुख्याधिकारी यांना दिला होता.
सदर अवैध बांधकामावर कारवाई न झाल्याने अखेर आज अक्षय्यतृतीयेच्या दिवशी अजय टप यांनी न.प. कार्यालयाच्या गेट समोर घागर पुंजून न.प.च्या चालढकल सुरू असलेल्या कामकाजाचा निषेध नोंदविला. आज मलकापूर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने झालेल्या या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा होती.
No comments