Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जगदीश मानवतकर यांचे कार्यालयात ही ठिय्या आंदोलन .....

  जगदीश मानवतकर यांचे कार्यालयात ही ठिय्या आंदोलन .....  वाशीम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  जगदीश मानवतकर यांनी कलावंताच्या पात्र...

 जगदीश मानवतकर यांचे कार्यालयात ही ठिय्या आंदोलन ..... 


वाशीम प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

जगदीश मानवतकर यांनी कलावंताच्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करावी याकरिता जिल्हा परिषद विभागाच्या समाज कल्याण कार्यालयात दिनांक 29.4.  2025 आपल्या कार्यकर्त्यांसह रोजी ठिय्या आंदोलन केले. या विभागाचे कर्मचारी दिनेश लहाडके यांनी 2024 ची यादी अद्यापही प्रकाशित केली नाही,  त्याचबरोबर सन 2018 पासून ते 2024 पर्यंतच्या याद्या या ऑनलाइन करणे आवश्यक आहे.  परंतु या याद्या समाज कल्याण विभागाच्या दिनेश लहाडके या  अधिकाऱ्यांनी अद्यापही ऑनलाईन केले नाही आणि वृद्ध कलावंतांची 2024 ची प्रकलावंतांची यादी अद्यापही प्रकाशित केली नाही . यामुळे जगदीश मानवतकर यांनी या याद्या प्रकाशित करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा या वेळी देण्यात आला.

 

ऑल इंडिया ब्ल्यु टायगर कलावंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदीश मानवतकर हे जिल्हा परिषद विभागाच्या समाज कल्याण विभागात गेले असता त्यांना अधिकाऱ्याचे काम हे कर्तव्यात कसूर, ढिसाळपण, कामसूकारपणा करण्याचे वाटले. वृद्ध कलावंत हे कार्यालयात दररोज चकरा मारतात परंतु त्यांना योग्य उत्तर मिळत नाही  आणि परत यायला सांगतात .  हे वृद्ध कलावंत वाशिम जिल्ह्यातील असून रिसोड , मालेगाव, मानोरा , कारंजा , मंगरूळपीर या तालुक्यातील विविध खेड्यातून या ठिकाणी येतात. परंतु त्यांची यादी प्रकाशित न केल्यामुळे त्यांना विनाकारण त्रास  करावा लागत आहे  . त्याचबरोबर चार ते पाच वर्षापासून याद्या प्रकाशित केल्या नसल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे. हीच गोष्ट घेऊन जगदीश मानवतकर यांनी या ठिकाणी भेट दिली आणि विविध प्रकारच्या निवेदनाने कलावंतांच्या याद्या प्रकाशित करा असे कळविले . परंतु निवेदन देऊनही काही फरक पडला नाही म्हणून जगदीश मानवतकर यांनी सरतेशेवटी कार्यालयामध्ये वृद्ध कलावंतांना घेऊन कार्यालयात ठिय्या आंदोलन केले . यावेळी अधिकारी यांनी लवकरच याद्या प्रकाशित करू आणि वृद्ध कलावंतांना मिळणारे मानधन हे त्यांना देऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले. यावेळी वाशिम जिल्हा परिषद चे सीईओ वैभव वाघमारे साहेब यांना सुद्धा जगदीश मानकर यांनी भेटून याद्या प्रकाशित कराव्या. या संदर्भात निवेदन दिले येत्या काही काळात याद्या जर प्रकाशित करण्यात आले नाहीत आणि वृद्ध कलावंतांना हक्काचे मानधन दिले नाही तर ऑल इंडिया ब्लू टायगर सेना तीव्र आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी ऑल इंडिया ब्लू टायगर सेनेचे संविधान ढोले सामाजिक कार्यकर्ते अरुण शेळके पाटील अक्षय इंगोले संजय पुंडसे प्रदीप खडसे रामदास कालापाड बादल वानखेडे भीमराव साळवे उत्तम ठाकरे यांच्यासह ऑल इंडिया ब्लू टायगर कलावंत सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

No comments