जि.प.प्राथमिक शाळा खेडीभोकरी येथील मुख्याध्यापक यांचा जिल्हास्तरीय व्हीडीओ स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक प्रदान शामसुंदर सोनवणे वि.प...
जि.प.प्राथमिक शाळा खेडीभोकरी येथील मुख्याध्यापक यांचा जिल्हास्तरीय व्हीडीओ स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक प्रदान
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
नुकताच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव मार्फत घेतल्या गेलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद खेडीभोकरी शाळेचे मुख्याध्यापक भास्कर शंकरराव पाटील यांचा छोटुशी भाजीवाली छान छान छान या भाषा विषय गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला यासाठी त्यांना दहा हजार रुपये रोख,ट्राफी,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जळगाव जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, डाएट चे प्राचार्य डॉ अनिल झोपे,माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पनाताई चव्हाण, डाएटचे अधिव्याख्याता डॉ जगन्नाथ दरंदले यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी भास्कर पाटील यांचे मा.जि प सदस्य शांताराम आबा गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे,केंद्र प्रमुख वैशाली पाटील, नरेंद्र सोनवणे,देवेंद्र पाटील शालेय व्यवस्थापन समीती खेडीभोकरी अध्यक्ष प्रविण पाटील, घनश्याम सोनवणे, सुनील पाटील, उपाध्यक्ष सोपान कोळी,सर्व सदस्य, ,रमेश शिरसाठ, रोहीदास कोळी,विक्रम बोरसे,हर्षल बागुले,परीक्षीत चव्हाण व गोरगावले केंद्रातील सर्व शिक्षक समन्वयक प्रंशात सोनवणे, मिलिंद पाटील, सर्व विषय शिक्षक यांनी अभिनंदन केले

No comments