adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयात रोजगार भिमुख शेळीपालन कौशल्य आधारित अभ्यासक्रम उपक्रम

  खडसे महाविद्यालयात रोजगार भिमुख शेळीपालन कौशल्य आधारित अभ्यासक्रम उपक्रम मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मुक...

 खडसे महाविद्यालयात रोजगार भिमुख शेळीपालन कौशल्य आधारित अभ्यासक्रम उपक्रम




मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या जी.  जी. खडसे महाविद्यालय येथील प्राणिशास्त्र  विभागाने पीएम उषा या महत्वकांशी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी रोजगार क्षमता कौशल्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे आयोजित केला. हा अभ्यासक्रम जानेवारी 2025 ते मार्च 2025 या तीन महिन्याच्या कालावधीत पार पडला. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व साहित्य महाविद्यालयाकडून पुरवण्यात आले. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीसाठी सक्षम बनवणे हा होता आणि तो उद्देश साध्य करण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचे प्रतीक म्हणून महाविद्यालयातील प्राचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. ही प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांना भविष्यातील संधीसाठी एक मजबूत पाठबळ देणार आहेत.

No comments