adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

" फक्त कर्जमाफी ने शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत,संपूर्ण शेती प्रश्नांसाठी,शिवरायांचे मावळ्यांनो गनिमी काव्याने लढा.. ....एस बी नाना पाटील.

 " फक्त कर्जमाफी ने शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत,संपूर्ण शेती प्रश्नांसाठी,शिवरायांचे मावळ्यांनो गनिमी काव्याने लढा.. ....एस बी नाना...

 " फक्त कर्जमाफी ने शेतकऱ्यांचे प्रश्न संपणार नाहीत,संपूर्ण शेती प्रश्नांसाठी,शिवरायांचे मावळ्यांनो गनिमी काव्याने लढा.. ....एस बी नाना पाटील. 

चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

....सुनील केंद्रेकर या आयुक्तांनी संपूर्ण मराठवाड्याचा अभ्यास करून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी चे मार्ग सुचवले ह्याच सत्ताधीश्यानी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले आणि तो अहवाल रद्दीत टाकला ते शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील यावर विश्वास ठेवणे हेच मुळी चुकीचे आहे.

   _शरद जोशी साहेबांनंतर  २०१६ चा शेतकरी पुत्रांनी घडवलेल्या ऐतिहासिक शेतकरी संपानंतर झालेली कर्जमाफी ही खऱ्या अर्थाने शेतकरी आंदोलनानंतर मिळालेलं यश होते.परंतु त्या नंतर शेतकरी नेत्यांना फोडून सरकारने शेतकरी आंदोलन कमकुवत केले ,त्यानंतर विविध संघटनांनी वेळोवेळी घेतलेल्या विसंगत भूमिकांमुळे सर्वसामान्य जनतेतील त्यांची विश्वासार्हता काही प्रमाणात कमी झाली.त्यात मी मोठा की तू ह्याने चळवळीचे खूप नुकसान झाले._ 

   लोकसभा निवडणुकीत महायुती ने राज्यात सपाटून मार खाल्याने लाडकी बहिण तसेच शेतकरी कर्ज माफी अश्या घोषणा केल्यात ज्या फक्त राज्यात सत्तेत येनेसाठी केल्यात हे जर चळवळीतील कार्यकर्ते यांना कळत नसेल तर मग तुम्ही शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून देणार?आता देखील प्रत्येकजण आपापल्या गल्लीत कुवतीप्रमाणे लहान मोठे आंदोलन करीत आहे याने तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे का?विरोधी पक्ष त्यांचे काम म्हणून ते करीत आहेत,पण शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तसे करू नये.अन्यथा शेतकरी उद्ध्वस्त होईल. 

  राज्यातील साऱ्या शेतकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र बसून शेतकऱ्यांच्या हितासाठी साऱ्या प्रश्नांवर काम केले पाहिजे  उदा:-(१) पिकविमा हा शेतकऱ्यांना विना सायास कसा मिळेल.(२)शेती बाबत चे संशोधन आज जवळ जवळ ठप्प आहे त्यात नवीन तंत्रज्ञान व आधुनिक बियाणे मिलनेसाठी प्रयत्न करणे.(३)शेतमालाला किमान आधारभूत किमती पेक्षा कमी भाव मिळू नये यासाठी राज्याला भावांतर योजना राबवणे संदर्भात प्रयत्न करणे.(४)शेतीत सध्या प्रचंड प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर वाढला आहे त्यासाठी सरकारी पातळीवर त्यांना मार्गदर्शन करणे साठी भाग पाडणे.(५)शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी विविध समित्यांनी सुचवलेले प्रस्ताव सरकारला स्वीकारायला भाग पाडणे.(६)कृषी मध्ये काम केलेल्या निवृत्त झालेल्या साऱ्या उच्च अधिकाऱ्यांची एक समिती तयार करून संघटनांनी कश्या पद्धतीने काम करावे यासाठी वारंवार त्यांच्यासोबत बैठका घेऊन नवीन रणनीती आखणे.(७)सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तर छत्रपतींच्या धोरणानुसार गनिमी काव्याने वेगवेगळे आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करून घेणे .

      _जर शेतकऱ्यांची चळवळ संपली तर भारतातून शेतकरी ही जमातच संपेल,त्याचे पाप आपणास लागेल त्यासाठी वेळीच एक व्हा._

No comments