adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुक्यात मागील एक महीन्यापासून धुमाकूळ घालुन दोन बालकांचे बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद

यावल तालुक्यात मागील एक महीन्यापासून धुमाकूळ घालुन दोन बालकांचे बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद    शब्बीर खान यावल ( प्रतिनिधी ) (संपादक -:- ...

यावल तालुक्यात मागील एक महीन्यापासून धुमाकूळ घालुन दोन बालकांचे बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद 


 शब्बीर खान यावल ( प्रतिनिधी )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल  तालुक्यात गेल्या एक महीन्यापासून धुमाकुळ घालुन दोन बालकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर वनविभागाने रात्रीच्या वेळेस यशस्वी सापळा रचुन केले जेरबंद शेतकरी व ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निस्वास.                                     या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावलच्या पश्चीम वनक्षेत्राच्या परिसरात मागील एक महीन्यापासुन धुमाकुळ घालणारा व दोन चिमकुल्या बाळांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जळगाव येथील यावल विभागाचे वनसंरक्षक जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डांभुर्णी शिवारातील काल बाळाची शिकार केलेल्या ठीकाणी काईभुई शेत शिवार गट क्रमांक ७४१ या शेतात पुनश्च बिबटया शिकार करण्यासाठी येणार असे नियोजन आखुन,यावल पश्चीम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे , पुर्व वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्यासह रेसक्यु पथकाचे वन कर्मचारी यांनी डांभुर्णी शिवारातील  यांच्या शेतात रात्री ९ ,३oवाजेच्या सुमारास बिबट्या शिकारीसाठी आला असता त्यास अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले .                                         दरम्यान जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यास बोरगाव ( नागपुर ) येथे पाठविण्यात आल्याचे वनविभागा च्या सुत्राकडून माहीती मिळाली असुन,बिबट्या वन विभागाच्या माध्यमातुन पकडला गेल्याचे वृत्त परिसरात कळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे .

No comments