adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

त्रंबकेश्वरमध्ये वणव्यांनी वाढवली चिंता..

  त्रंबकेश्वरमध्ये वणव्यांनी वाढवली चिंता..  प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर तालुका हा पर्या...

 त्रंबकेश्वरमध्ये वणव्यांनी वाढवली चिंता.. 


प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

त्र्यंबकेश्वर तालुका हा पर्यावरण आणि निसर्ग संपदेचा दृष्टिकोनातून आजही अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यात अनेक ठिकाणी वन विभागांमध्ये,खाजगी मालकी मध्ये वनवे लागल्याने तेथील डोंगर टेकड्यांचे स्वरूप भकास झालेले दिसून येत आहेत दरम्यान हा विषय फार मोठा चिंतेचा ठरला असून येणारा काळ हा रुद्र स्वरूप धारण करेल यात काही शंका नाही. त्र्यंबकेश्वर जवळील गणपत बारीच्या वनविभागाच्या जंगलाला सलग तीन वर्षे झाले आग लागत आहे ही आग लावली जाते की लागते हा प्रश्न नागरिकांना पडतोय आगीमुळे जमिनीवरील पाला पाचोळा गवत व लहान झाडे झुडपे पक्षांचे घरटे जळून खाक झाले आहेत गणपत बारीच्या वन विभागाला आग लागते त्याचे कारण म्हणजे वन कर्मचारी आणि नेमलेले वॉचमन यांचे देखील या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.


//प्रतिक्रिया//

या वन विभागाच्या जंगलाला दरवर्षी आग लागते ही आग जाणून-बुजून लावली जाते का या वनव्यामध्ये झाडे झुडपे पक्षांचे घरटे सरपटणारे प्राणी हे नष्ट होतात. यांचा सर्वेक्षण झाले पाहिजे. या वनव्याला जबाबदार वनरक्षक,वॉचमन यांचा दुर्लक्ष असल्यामुळे जंगलाला आग लागते. अशा संबंधित वनरक्षकावर कारवाई झाली पाहिजे.

        उत्तम लिलके

भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष



No comments