४९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत यशस्वीरित्या संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:- तालुक्यातील...
४९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत यशस्वीरित्या संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील एकूण ४९ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय मलकापूर येथे आज सकाळी ११ वाजता तहसीलदार आर. एम. तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ही आरक्षण सोडत महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ०५ मार्च २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार व जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या सुधारीत अधिसूचनेनुसार, ग्रामपंचायत अधिनियम व १९६४ मधील नियमावलीनुसार २०२५ ते २०३० या कालावधीतील सार्वत्रिक निवडणुकीसाठी करण्यात आली. कार्यक्रमात सर्वप्रथम अनुसूचित जातींसाठी आरक्षित ग्रामपंचायती जाहीर करण्यात आल्या. यामध्ये ८ ग्रामपंचायती – उमाळी, जांबुळधाबा, चिखली, देवधाबा, घिर्णी, वाघोळा, मोरखेड बु., आणि कुंड बु. यांचा समावेश होता. यानंतर अनुसूचित जमातींसाठी ४ ग्रामपंचायती – तांदुळवाडी, वाकोडी, धरणगाव, व वडोदा यांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. नंतर नागरिकांचा मागासवर्ग (ना.मा.प्र.) या प्रवर्गासाठी १२ ग्रामपंचायतींची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली. यामध्ये लासुरा, कुंड खुर्द, तिघ्रा, हरसोडा, वाघुड, पिंपळखुटा महादेव, अनुराबाद, भालेगाव, पान्हेरा, नरवेल, वरखेड, व काळेगाव या ग्रामपंचायती आहेत. उर्वरित २५ ग्रामपंचायती सरपंच पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गात ठेवण्यात आल्या. त्यामध्ये हिंगणा काझी, पिंपळखुटा बु., निमखेड, म्हैसवाडी, बहापुरा, गोराड, तालसवाडा, खामखेड, माकनेर, आळंद, विवरा, लोणवडी, वडजी, भानगुरा, हरणखेड, दुधलगाव खुर्द, झोडगा, शिराढोण, निवारी, दाताळा, भाडगणी, दुधलगाव बु., बेलाड, मलकापूर ग्रामीण व दसरखेड या गावांचा समावेश आहे.
या सोडत प्रक्रियेला मलकापूर तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे हे आरक्षण सोडतीचे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निवासी नायब तहसीलदार डॉ. चारुशिला चौधरी, सहायक महसूल अधिकारी सी. पी. पाटील, पी. डी. भारंबे, महसूल सहायक जी. यु. खुळे, महसूल सेवक सचिन चोपडे आणि सुनील न्हावकर यांनी विशेष मेहनत घेतली. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून सोडतीची प्रक्रिया समाप्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.
No comments