adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाचनासाठी दिवसातील किमान एक तास द्या - जिल्हाधिकारी : डॉ. पंकज आशिया

  वाचनासाठी दिवसातील किमान एक तास द्या - जिल्हाधिकारी : डॉ. पंकज आशिया  प्रतिनिधी संतोष लांडे (संपादक -:-हेमकांत गायकवाड) स्नेहबंध सोशल फौंड...

 वाचनासाठी दिवसातील किमान एक तास द्या - जिल्हाधिकारी : डॉ. पंकज आशिया 


प्रतिनिधी संतोष लांडे

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

स्नेहबंध सोशल फौंडेशनचे आवाहन, जागतिक पुस्तक दिनानिमित्त दिली पुस्तके भेट 

अहिल्यानगर - सध्याच्या काळात मोबाईल, सोशल मीडिया चॅनल आणि ई-ग्रॅझेट यांचा प्रभाव वाढत असल्याने वाचनाची सवय कमी होत आहे. परंतु वाचनासाठी प्रत्येकाने दिवसातील किमान एक तास द्या, असे आवाहन स्नेहबंध सोशल फौंडेशनने केले. 

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना पुस्तक भेट देताना स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे. समवेत पोलीस उपअधीक्षक अमोल भारती

स्नेहबंध फौंडेशन राजकीय, सामाजिक शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्यिक या क्षेत्रातील मान्यवरांना पुस्तके भेट देऊन जागतिक पुस्तक दिन साजरा केला. 

वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्यिक, अधिकारी व शाळांना पुस्तके भेट दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती उपस्थित होते.

आजच्या धकाकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये वाचनाची सवय व आवड कमी होत चालली आहे. हि वाचन संस्कृती टिकावी आणि ती अधिक वाढावी यासाठी पुस्तक भेट देण्याचा हा उपक्रम राबवला, असे 'स्नेहबंध' चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले

No comments