adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सकल जैन समाज चोपडा द्वारे जैन समाजावर होणारे अत्याचार व पहलगाम हिंदू हत्याकांड निषेधार्थ भव्य मूक मोर्चाचे आयोजन

  सकल जैन समाज चोपडा द्वारे जैन समाजावर होणारे अत्याचार व पहलगाम हिंदू हत्याकांड निषेधार्थ भव्य मूक मोर्चाचे आयोजन  चोपड़ा (प्रतिनिधि)---  (स...

 सकल जैन समाज चोपडा द्वारे जैन समाजावर होणारे अत्याचार व पहलगाम हिंदू हत्याकांड निषेधार्थ भव्य मूक मोर्चाचे आयोजन 


चोपड़ा (प्रतिनिधि)--- 

(संपादक हेमकांत गायकवाड )

गेल्या काही दिवसापासून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात जैन धर्मियांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात जैन साधूं कडून पैशाची मागणी करत मारहाण केली, विलेपार्ले येथे अतिक्रमण च्या नावाने जैन मंदिराची तोडफोड करण्यात आली, साधुसंत रस्त्यावर विहार करत असताना जाणीवपूर्वक कट मारून अपघात घडवून आणण्यात येत आहे, परवा पहलगाम काश्मीर येथे हिंदू पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली 


अशा सर्व घटनेने संपूर्ण जैन समाज व हिंदू समाज दुखावला गेला असून शासनातर्फे दोषींवर कडक शासन करण्यासाठी व सदरील सर्व घटनांच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आज चोपडा तालुका सकल जैन समाजातर्फे निषेध मूक मोर्चा काढण्यात आला 


मोर्चाची सुरुवात रथ गल्ली येथून जैन मंदिर पासून करण्यात आले शांततेत मार्ग क्रमांक करत शनी मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कचेरी पर्यंत मोर्चाचे समापन करण्यात आले

समारोप वेळी दीपक राखेच्या यांनी सर्व घटनेच्या उल्लेख करत व मोर्चाचे महत्त्व विशद करत सूत्रसंचालन केले, दिलीप नेवे यांनी इतर अनेक घटनांच्या उल्लेख करत निषेध व्यक्त केला , प्रा. शांतीलाल बोथरा यांनी नायब तहसीलदार योगेश पाटिल यांना निवेदन देत दोशींवर कडक शासन करण्यात यावे अशी मागणी केली 

निवेदनावर राजेंद्र जैन, रमेश जैन, संजय श्रावगी,  आदेश बरडीया सुनील जैन, डॉ. निर्मल जैन भारतीय जैन सघटनेचे जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, विभागीय उपाध्यक्ष लतिश जैन यांच्या सह्या होत्या त्या सोबतच समाजातील सर्व सदस्यांचे सह्यांचे निवेदनही सोबत देण्यात आले मोर्चा यशस्वीतेसाठी जैन नवयुवक मंडळ बहु मंडळ भारतीय जैन संघटनाच्या सदस्यांनी परिश्रम केले

No comments