adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात. ▪️औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी

  धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात. ▪️ औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसी...

 धरणगाव तहसीलला नागरी सेवा दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त विशेष बैठक उत्साहात.

▪️औद्योगिक गुंतवणूकदारांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार; तहसीलदार सूर्यवंशी 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : धरणगाव तालुक्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन करणेसाठी मा.तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांचे अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख,  उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी, व्यापारी, पत्रकार आदींची बैठक उत्साहात पार पडली.

     भारतात दरवर्षी २१ एप्रिल नागरी सेवा दिन साजरा केला जातो. हा दिन प्रशासकीय सेवेतील व्यक्तींच्या समर्पित सार्वजनिक सेवेच्या सन्मानार्थ आणि लोककल्याणासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी पाळला जातो. त्याचप्रमाणे, १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, जो महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसोबतच मराठी संस्कृती, परंपरा आणि प्रशासकीय कर्तृत्वाचा उत्सव आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रसंगांचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यात दि.२१ एप्रिल,२५ (नागरी सेवा दिन) ते ०१ मे,२५ (महाराष्ट्र दिन) या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत धरणगाव तालुक्यात आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन करणेसाठी,  व लहान मोठ्या उद्योग व्यवसायांना वाढविणेसाठी, चालना मिळण्यासाठी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी तालुक्यातील सर्व उद्योजक, व्यापारी, कामगार संघटना, शेतकरी संघटनाचे पदाधिकारी यांचेसोबत उद्योग व्यवसायावर विविध चर्चा झाली. तहसीलदार सूर्यवंशी यांनी सांगितले की, सदर मोहीम यशस्वीपणे राबविल्यास लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची निर्मिती होईल. यामुळे नागरिकांचे जीवनमान सुकर होईल, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होतील आणि शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. यावेळी एमसीइडी जिल्हा समन्वयक (जिल्हा उद्योग केंद्र) समीर भाटिया, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक निलेश चौधरी, भाजप नेते ॲड. व्ही एस भोलाणे, कृषी अधिकारी के एच देसले, व्यापारी असो. अध्यक्ष संजय कोठारी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, मेडिकल असोसिएशन सचिव छोटू जाधव, लेखापाल आर जी पाटील, वाय एस बेडसे, माजी नगरसेवक तथा शेतकरी भागवत चौधरी, एचडीएफसी बँकचे प्रफुल सोनवणे, अभि.सहा. आर एच चौधरी, महसुलचे वरिष्ठ लिपिक गणेश पवार, उद्योजक निखिल बयस, माहिती अधिकार कायदा महासंघाचे राजेंद्र वाघ, पत्रकार विनोद रोकडे, निलेश पवार आदी उपस्थित होते. विशेष मोहीम कार्यक्रम अंतर्गत बैठक यशस्वीतेसाठी कृष्णा बाविस्कर, साकिब खान, विशाल सोनार, शांताराम चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

No comments