सावद्यात अज्ञाताने मृत अभ्रक टाकल्याने खळबळ गुन्हा दाखल पोलीसांकडून तपास सुरू रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी रावेर तालुक्यातील सावदा येथील...
सावद्यात अज्ञाताने मृत अभ्रक टाकल्याने खळबळ
गुन्हा दाखल पोलीसांकडून तपास सुरू
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील सावदा येथील बाजारपेठेच्या जवळपास मोठा आखडा चौकातील मशिदीच्या बाहेर एका अज्ञात व्यक्तीने गर्भाशयातील तीन ते चार महिन्यांच्या एका दिवसाच्या मृत अभ्रकास
सोडून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सावदा शहरात चिंता आणि संताप व्यक्त होत आहे ता. २४ एप्रिल २०२५ सकाळी ९ वाजता उघडकीस आली. स्थानिक नागरिकांना मशिदीच्या बाहेर एका कपड्यात गुंडाळलेले मृत बालकाचे अभ्रक आढळून आले. या मृत अभ्रक बालकास कोणी तरी अज्ञाताने सोडून गेल्याची चर्चा सुरू आहे. नागरिकांनी तातडीने याबाबत सावदा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत अभ्रक ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर
घटनेने मृत निरागस बालकाला अशा प्रकारे रस्त्यावर सोडून जाणे ही अत्यंत अमानुष निर्दयी कृती आहे,” असल्याची नाराजीची भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. सदर घटनेप्रकरणी शेख रहीम शेख मंजूर यांनी सावदा पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे
(अभ्रक सोडून जाणारी अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. “बालकाला सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असे सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले )

No comments