श्रीमती जी जी खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा कार्यशाळा संपन्न मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:-हेमका...
श्रीमती जी जी खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा कार्यशाळा संपन्न
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयात पीएम-उषा अंतर्गत महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्या वतीने राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत महाजन उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. संदीप नेतनराव पी.के. कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नेतनराव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा हा राष्ट्रीय शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षण धोरण (2020) नुसार उच्च शिक्षणातील एक मानक आणि समान पात्रता प्रणाली तयार करण्यासाठी राबवला जात आहे, ज्यामुळे शिक्षण आणि कौशल्यांमध्ये सुसंगता आणि कौशल्य आधारित गुणात्मता प्राप्त होईल असे उद्बोधन केले.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य महाजन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (2020) च्या नुसार राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा अंमलबजावणी करून कौशल्य आधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्यात गुणात्मता निर्माण होईल त्यामुळे आपण विकसित देशाकडे वाटचाल करू अशी अशा व्यक्ती केली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रा. अतुल बढे यांनी प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व पीएम-उषाचे समन्वयक अनिल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पीएम-उषा सहसमन्वयक प्रा.डॉ. अतुल वाकोडे यांनी केले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments