adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सत्कार.

  किनगाव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सत्कार.  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गा...

 किनगाव इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटातील महिलांचा सत्कार. 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज प्रत्येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसून येतात म्हणून इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगाव  येथील स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष विजयकुमार पाटील संचालिका सौ.पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांनी ठरवले की आपणही या महिलांचा गौरव करावा आणि शेवटी महिला दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगाव येथे महिला बचत गट अंतर्गत कार्य करणाऱ्या ग्राम सखी,पशु सखी व सी.टी.सी.यांच्या सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले

 म्हणून प्रथम बचत गट अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिलांना निमंत्रण देण्यात आले आणि आपल्यावर असणाऱ्या संसार रुपी विविध कार्याचा जबाबदारीतून थोडी मोकळीक मिळावी त्यांच्यासाठी विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते त्यात तळ्यात मळ्यात,बकेट बॉल,बलून डान्स,नलिकेचा साह्याने बॉटल पाण्याने भरणे,गट तयार करणे,पाण्याची बाटली भरणे इ. गेम खेळून महिला सखींनी आनंद मिळवला

त्यानंतर  सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्व. केतन दादा मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष व इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून वर्षा पाटील आणि बँक सखी  माधुरी सोनवणे होते तर स्व. केतन दादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ.पूनम मनिष पाटील  मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता असलेल्या सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर सौ.पुनम मनिष पाटील व महिला शिक्षिका यांनी किनगावसह परिसरातील सर्व महिला बचत गटाच्या ग्राम सखी,पशु सखी,सी.टी.सी,व सीआरपी इत्यादी गटा अंतर्गत कार्य करणाऱ्या महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी आलेल्या महिला सखींनी आपले मनोगत देखील व्यक्त केले की ते संसार रुपी गाडे ओढुन कशा पद्धतीने या बचत गटात कार्य करतात आणि इतरांनाही प्रोत्साहन देतात हे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक  अशोक प्रतापसिंग पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की पुढे आपण बचत गटांतर्गत ज्या सचिव अध्यक्ष असतील त्यांचाही सत्कार करणार आहोत शाळेचे सचिव मनीष विजयकुमार पाटील यांनीही महिला सखींचा कार्याचा गौरव केला त्यानंतर  सौ.पूनम मनिष पाटील यांनी महिला सखींना एक संदेश दिला की ज्याप्रमाणे घरातील सर्व कामे सांभाळून आपण विविध गटात कार्य करीत आहोत त्याचप्रमाणे आपले एक महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे आपले मुलं आणि आपण सुरक्षित आहोत की नाही आपली मुलं आपल्याशी त्यांना येणाऱ्या अडचणी हितगुज करतात की नाही हेही आपण पाहिले पाहिजे कारण समाजात विविध अमाणूष कृत्य घडत आहेत मग ते मुलांसोबत मुलींसोबत कोणा सोबतही घडू शकतात म्हणून आपण सतर्क राहिले पाहिजे याकरिता आमचे शालेय मंडळही कार्य करीत आहे तुम्हीही महिला बचत गटांतर्गत हा संदेश सर्वांना द्याल अशी मी आशा बाळगते असे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा धनगर व प्रास्ताविक तिलोत्तमा महाजन यांनी तर आभार प्रदर्शन योगिता बिहारी यांनी केले या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

No comments