शिर्डीतील पत्रकारास धमकावणाऱ्याचा जाहिर निषेध कठोर शासन करण्याची पत्रकार फेडरेशन ची मागणी शिर्डी / प्रतिनिधी: संपादक हेमकांत गायकवाड शिर...
शिर्डीतील पत्रकारास धमकावणाऱ्याचा जाहिर निषेध
कठोर शासन करण्याची पत्रकार फेडरेशन ची मागणी
शिर्डी / प्रतिनिधी:
संपादक हेमकांत गायकवाड
शिर्डी शहरातील शेअर्स मार्केट घोटाळ्याबाबत बातमी प्रकाशित करुन सत्य परिस्थिती उघडकीस आणत असताना दैनिक साईदर्शन चे संपादक ज्येष्ठ पत्रकार जितेश लोकचंदानी यांना फोनकॉलद्वारे धमकी देणाऱ्या संबंधित दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यातर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येवून कठोर शासन करावे अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन महाराष्ट्र राज्य (उत्तर महाराष्ट्र) अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सर्वसामान्य जनतेची लूट करायची आणि स्वत: चे काळेकुट्ट कारनामे उघडकीस न येवू देण्यासाठी पत्रकार, संपादक यांना धमकी देणाऱ्या संबंधित महाभागाचा जाहीर निषेध करण्यात आला असून या प्रकरणी अखिल भारतीय पत्रकार फेडरेशन महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आणी पदाधिकारी लवकर पोलिस महासंचालकांना निवेदन देणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments