फैजपूर येथे हिरवागार निकोप वृक्ष तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी? रावेर यावल तालुक्यात लाकूड माफियांचा धुमाकूळ दररोज असंख्य वृक्षांची होते...
फैजपूर येथे हिरवागार निकोप वृक्ष तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी?
रावेर यावल तालुक्यात लाकूड माफियांचा धुमाकूळ दररोज असंख्य वृक्षांची होतेय कत्तल? ट्रॅक्टर ट्रक वर ताडपत्री किंवा फट झाकून केली जातेय अवैध लाकडांची वाहतूक वनविभाग डोळे झाकून?
रावेर विभागिय संपादक मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील मुख्य अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील हिरवागार निकोप वृक्ष तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी? सविस्तर असे की बुऱ्हानपूर अंकलेश्वर या महामार्गावरील
सावदा ते फैजपुर. दरम्यान असलेल्या रस्त्यावरील डेरेदार हिरवागार विशाल महाकाय कडू निंबाच्या जीवंत वृक्षाची अमाणूषपणे कत्तल करण्यात आली आहे
कुणावर मेहर नजर किंवा आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी ? कोणतीच चौकशी अथवा रितसर स्थळनिरक्षण न करता("हम करे सो कायदा")या म्हणीला अनुसरून वन परिक्षेत्र अधिकारी श्री.फटांगरे यावल पुर्व यांनी कोणत्याही ठोस कारण नसताना फक्त संबंधित अर्जदाराचे अर्ज प्रमाणे बुऱ्हानपूर-अंकलेश्वर सारखे महामार्गावरील सावदा-फैजपुर रस्त्यावर असलेल्या मेरिडियन प्लाझा हॉटेल समोरील जीर्ण नसलेला १०० ते १२५ फुटाचे एका डेरेदार हिरवेगार जींवत कडुनिंबाचे झाडाला तोडण्यासाठी या अटीवर परवानगी दिली आहे की,सदरील झाड तोडा पंरतू त्या बदल्यात नविन दोन झाडे लावून त्यांचे संगोपन करावे.संगोपन न केल्यास दंड आकारण्यात येईल.या अजब गजब प्रकाराची परवानगी मुळेच सदर ठिकाणी खुलेआम या हिरवेगार झाडाची अमाणूषपणे कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
तरी एका बाजूला महाराष्ट्र राज्य चे पर्यावरण मंत्री यांनी ५० वर्षांहून अधिक वयाचे वृक्ष जगविण्यासाठी त्यांना(हेरिटेज)वृक्षाचा दर्जा दिला आहे.तर त्यांच्याच राज्यातील जळगाव जिल्ह्यातील यावल वन परिक्षेत्र अधिकारी श्री.फटांगरे हे अशा प्रकारे डेरेदार झाड तोडण्याची अजब गजब परवानगी देत असेल तर यावरून निदर्शनास येते की,पर्यावरणाची चिंता न करता अशा परवानग्या या वन अधिकाऱ्यानी यापूर्वी सुद्धा दिले असेल?तरी ही बाब थेट पर्यावरणास धोकादायक असून,या अनुषंगाने चौकशी होऊन त्याची खातेनिहाय चौकशी होणे आवश्यक आहे.तसेच हा प्रकार बिनदिक्कत वृक्षतोडीला प्रोत्साहन देत असल्यासारखे दिसून येते.यामुळे वन आणि,पर्यावरणीय कायदे सह संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था,सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत परिसराचे पर्यावरणचा कमालीचा समतोल बिघडत असून,शहराच्या विस्तारामुळे प्रदूषणाची पातळी सुद्धा वाढत आहे.या गंभीर बाबींकडे सोयीस्कररीत्या की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मनमानी कारभार चालवणारे वन अधिकारी सह झाड तोडण्याची परवानगी घेणारे व्यक्ती व या जीवंत झाडास राजेरोसपणे कत्तल करणाऱ्यांवर वन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेवर दखल घेऊन नियमानुसार कठोर कारवाई करण्याची गरज आहे.अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. तसेच यासंदर्भात पुराव्यानिशी काही वृक्षप्रेमी नाशिक व जळगाव वन विभाग आणि जिल्हा अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे दोषींवर कठोर कारवाईची मागणी लवकर करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

No comments