adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी तर अविनाश पाठक यांची मुंबईला बदली, बीडमध्ये एसपीनंतर कलेक्टरांची देखील बदली

विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी तर अविनाश पाठक यांची मुंबईला बदली, बीडमध्ये एसपीनंतर कलेक्टरांची देखील बदली    संभाजी पुरीगोसावी ( बीड ज...

विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी तर अविनाश पाठक यांची मुंबईला बदली, बीडमध्ये एसपीनंतर कलेक्टरांची देखील बदली 


 संभाजी पुरीगोसावी ( बीड जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

 राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांची खांदेपालट सूरच असून. मात्र पुन्हा 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बीड जिल्ह्याचे अविनाश पाठक यांना बढती देण्यात आली. तर बीडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात गेल्या महिन्यांपासून बीड जिल्हा केंद्रस्थानी असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमध्ये पोलीस खात्यातही चांगलाच बदल पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी बीडमध्ये दीपा मुधोळ मुंडे या जिल्हाधिकारी म्हणून होत्या. त्यांचीही लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यात बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता विवेक जॉन्सन यांच्याकडे बीड जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, लवकरच नूतन जिल्हाधिकारी हे सन 2018 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात देखील त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आणला होता, त्यांच्या नियुक्तीमुळे बीड जिल्ह्याला सर्व सामान्यांना प्रथम न्याय देणारा जिल्हाधिकारी लाभला आहे, नूतन जिल्हाधिकारी लवकरच बीड जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारणार आहेत.

No comments