तरोडा येथील जागृत हनुमान मंदिरास गोमाता दान, धनगर कुटुंबाचे दातृत्व रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक-:- हेमकांत गायकवाड) रावेर तालु...
तरोडा येथील जागृत हनुमान मंदिरास गोमाता दान, धनगर कुटुंबाचे दातृत्व
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यात हनुमान जन्मोत्सव दिनांक १२ रोजी साजरा करण्यात आला. हनुमान जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे भंडाराचे प्रसादाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने हनुमान जयंती दिनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त कुंभारखेडा, चिनावल, गौरखेडा येथून जवळच असलेले तरोडा येथील जागृत हनुमान मंदिर येथेही भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हनुमान जन्मोत्सवाचे निमित्त साधून विठ्ठल बारकू कोळपे या धनगर दापत्याने तरोडा हनुमान मंदिरास त्यांच्या मालकीची गोमाता मंदिरात दान करून समाजासमोर दातृत्वाचे उदाहरण स्पष्ट केले. त्यांच्या या दानशूरता व दातृत्वाचे परिसरामध्ये कौतुक होत आहे. अशा प्रकारे समाजातील दानशूर व्यक्तींनी ही या मंदिरास दातृत्वाची भूमिका ठेवली तर हे मंदिर प्रख्यात होऊन नावारुपाला येईल, अशी अपेक्षा परिसरातील भक्तांमध्ये बोलली जात आहे.
तरी परिसरातील हनुमान भक्तांनी या मंदिराला दातृत्वाची भूमिका ठेवून दान करण्याचे आवाहन समाजातील हनुमान भक्तांनी केले आहे.

No comments