सर्व शासकिय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) भुसाव...
सर्व शासकिय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भुसावळ - येथील तहसील कार्यालयात पिण्याची पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समक्ष भेटून पिण्याची पाण्याची सुविधा देण्याबाबत विनंती अर्ज दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ येथील तहसील कार्यालयात तालुकाभरातून अनेक लोक शासकिय कामासाठी येत असतात. अशातच आता उन्हाळा सुरू झाला असून सध्या भुसावळसह परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या वर गेलेले आहे. असे असतांना तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कुठलिही सुविधा नसल्याने येणार्या लोकांना त्रास सहन करावा लागतो. सध्या मुख्यमंत्री महोदयाचे शंभर दिवसांच्या योजनेचा कार्यक्रम सुरू असून अशावेळी कार्यालयीन सुविधा नसल्याने त्रास सहन करावा लागतो. तरी उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा आवश्यक आहे. याकरिता आपणास विनंती करण्यात येते की, आपण भुसावळ तहसील कार्यालयासह इतर सर्व शासकिय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत अधिकार्यांना लेखी कळवावे, आपण केलेल्या कारवाईची एकप्रत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी देण्यात यावी अशी विनंती देखील श्री.सानप यांनी केली आहे. यावेळी विनंती अर्ज स्वीकारल्यानंतर श्री. सानप यांनी दिलेल्या तक्रारीबद्दल व माहितीदिल्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले.

No comments