adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा,आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या जेलभरो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद

  भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा,आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या जेलभरो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसा...

 भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा,आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या जेलभरो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद 


जळगाव प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव "महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात मिळालेच पाहिजे ओबीसी प्रवर्गाची जातनी हाय जनगणना करा अन्यथा खुर्ची खाली करा ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा/संशोधित वक्फ विधेयक रद्द करा रद्द करा'अशा घोषणांचा जयघोष करत शेकडो महिला पुरुष पोलीस  व्हॅन मध्ये बसून स्वतःला अटक करून घेत होते. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क,भारत मुक्ती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम आणि राष्ट्रीय पीछडावर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चौधरी विकास पटेल यांच्या माध्यमातून ई.व्ही.एम च्या विरोधात महाबोधी महाविहार मुक्तिसंदर्भात ओबीसींच्या जातीनिहा जनगणनेच्या समर्थनात महापुरुषांबाबत अपमान जनक वक्तव्याच्या विरोधात आणि संशोधित वक्फ कायद्याच्या विरोधात पाच चरणात राष्ट्रव्यापी आंदोलन घोषित केले होते.


त्याचाच भाग म्हणून ९ एप्रिल २०२५ वार- बुधवार रोजी राष्ट्रव्यापी जेलभरो करण्यात आले. जळगाव मध्ये ही सदर जलभरो आंदोलनाला अबूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये म.गांधी यांनी स्वेच्छेने जेलमध्ये जाण्याचा प्रयोग करून ब्रिटिश सरकारला सैरभैर करून सोडले होते. प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग तर आहेच आहे.

बरोबरीला लोकांच्या मनातील जेलचे भीती काढून टाकण्यासाठी आणि लोकांना मोठ्या लढायला तयार करण्यासाठी सुद्धा हाच मार्ग प्रभावी असल्यामुळे वामन मेश्राम सातत्याने अशा पद्धतीची आंदोलने घोषित करत आहेत अन्य त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला संपूर्ण देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.संपूर्ण जिल्हाभरातील कार्यकर्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर १२:०० वाजल्यापासून जमा होत होते. ही संख्या वाढत जात होती. शेवटी सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी डिटेल केले व सायंकाळी चार वाजता सर्वांना सोडून दिले. सदर आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मुकेश नेतकर, जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, बहुजन क्रांती मोर्चाचे शहर संयोजक सुनील देहडे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ खरे, बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष राहुल सपकाळे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदे महाराष्ट्र राज्य महासचिव रंजीत तडवी,खुशाल सोनवणे, सायबु तडवी, कलीम तडवी, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हाध्यक्ष अरुण जाधव, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गफूर तडवी,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ. शाकीर शेख, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य राहून तडवी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदलाल आगारे, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रज्ञा सोनवणे कल्पना मस्के.

No comments