मनवेल येथील श्री भुवनेश्वरी आश्रमाचे लोकसभागातून जिर्णोद्धार भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावलः येथू...
मनवेल येथील श्री भुवनेश्वरी आश्रमाचे लोकसभागातून जिर्णोद्धार
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावलः येथून एक की मी अंतरावर असलेल्या श्री भुवनेश्वरी मातेच्या मंदिराचे नव्याने बांधकाम करून जिर्णोद्धार करण्याचा कामाला लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे.मनवेल गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुवनेश्वरी आश्रम गुजरात सौराष्ट्र येथे एक असून दुसरे मनवेल येथे आहे.
श्री भुवनेश्वरी आश्रमाची स्थापना १९४२ साली श्री बनवारीदास बाबा यांनी मंत्र शक्तीने अग्नी प्रज्वलीत करून अखंड धुनी चालु केली होती ती आज ८३ वर्षांपासून सुरूच आहे. या आश्रमाला शासनाकडून क दर्जाचे तिर्थक्षेत्र चा दर्जा देण्यात आला आहे गावकऱ्यांच्या मदतीने मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्पना युवक मंडळीने घेतला आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून वर्गणी जमा करण्यात येत आहे.
मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर वॉल कंपाऊड करून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गमय गार्डन करणे, मंदिराची उभारणी करणे, शेतातील रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गुरा-ढोरांसाठी, शेतकरी व शेतमजुरांना पिण्याच्या पाणी व्यवस्था करणे यासह विविध कामे देगणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मंदिराच्या जिर्णोद्धार करण्यासाठी दानशुर व्यक्तीनी शिवाजी रामकृष्ण पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे .
No comments