मा.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत आदिवासी बहुल भागातील खाऱ्यापाडाव जि. प.शाळा तालुक्यात द्वितीय क्रमांकाने सन्मानित शामसु...
मा.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत आदिवासी बहुल भागातील खाऱ्यापाडाव जि. प.शाळा तालुक्यात द्वितीय क्रमांकाने सन्मानित
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण संस्थेमार्फत मा.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत आदिवासी बहुल भागातील खाऱ्यापाडाव जि. प.शाळा तालुक्यात द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक विजय कचवे यांना आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रमाणपत्र ,ट्रॉफी दोन लाख रू. बक्षीस देण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी अनिल विसावे ,गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे , केंद्रप्रमुख देवेंद्र पाटील पंकज विद्यालयाचे पंकज बोरोले ,सरपंच दत्तरसिंग पावरा ,सदस्य गोविंद बारेला ,जयसिंग पावरा,शाळा समितीचे राजू पावरा ,वृक्षमित्र आर.आर. सोनवणे ,सुकलाल बारेला,रवींद्र पाटील ,विकास पाटील उपस्थित होते. शाळेने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments