पथराडे येथे संगीत शिवपुराण कथा व अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड मनवेल ता.यावल ः य...
पथराडे येथे संगीत शिवपुराण कथा व अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
मनवेल ता.यावल ः येथुन जवळच असलेल्या पथराडे येथे १८ एप्रिल पासुन संगीत शिवपुराण कथा व अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली असुन कीर्तन सप्ताहाची सांगता २५ एप्रिल रोजी ह.भ.प.करपात्री चांगदेव महाराज चंद्रपुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
या सप्ताहात रोज सकाळी ४ ते ५ ग्रामसफाई, ५ ते ६ काकडा आरती, सकाळी ९ ते ११ शिवपुराण कथा, दुपारी २ ते ५ भागवत कथा, सध्या ६ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ रोज कीर्तन होणार आहे.
२० रोजी फेब्रुवारी रोजी सुदर्शन महाराज शेगाव, पंढरपूरकर, २१ रोजी ह.भ.प. अंकुश महाराज मनवेलकर, २२ रोजी नारायण महाराज मेहुणकर, २३ रोजी आदीनाथ महाराज जळकेकर, २४ रोजी अमोल महाराज रिगावकर, व २५ रोजी करपात्री चांगदेव महाराज यांचा काल्याच्या कीर्तनातुन सप्ताहाची सांगता होणार आहे.
२५ एप्रिल रोजी दुपारी महाप्रसाद व दिंडी सोहळा निघणार असुन परीसरातील भावीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पथराडे ग्रामस्थांनी केले आहे
No comments