adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप

  चोपडा येथे छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप  विश्राम तेले चौगाव ता.चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथे बुधवार दिनांक १६ एप्रिल र...

 चोपडा येथे छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप 


विश्राम तेले चौगाव ता.चोपडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथे बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी  छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब प्रा‌.चंद्रकांत सोनवणे  यांच्या मार्गदर्शनात युवा उद्योजक मा. पियुषभाऊ चौधरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. शहरात ठिकठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय करतात. कधी पाऊस तर कधी उन्हाचा त्यांना सामना करावा लागतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाजी, फळ, कपडा विक्रेते यासह फूटपाथवर बसून उदरनिर्वाह करणा-या विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आली. यामुळे या छोट्या विक्रेत्यांना मोठा आधार मिळाला आहे. विक्रेत्यांनी पियुषभाऊ चौधरी यांचे आभार मानले. यावेळी चोपडा कृऊबा चे सभापती नरेंद्र पाटील,शहर पोलिस स्टेशन चे पीआय मधुकर साळवे,राजेंद्र पाटील बिटवा,किशोर चौधरी,कृउबा संचालक ॲड शिवराज पाटील,गोपाल पाटील,किरण देवराज,सुनिल बरडिया,विपीन जैन,दिव्यांक सावंत,बिलाल शेख,प्रदिप बारी,नंदू गवळी,मोईन कुरेशी,जावेद शेख,योगेश पाटील,अनुप जैन,आबिद शेख,ईलु शेख,सुनिल पाटील,अतुल चौधरी,भुषण भिल व पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments