गांधी संस्कार परीक्षेत पारंबी विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीची जिल्हास्तरावर निवड इ दू पिंजारी फैजपूर - (संपादक -:-हेमकांत गायकवाड) नवीन ...
गांधी संस्कार परीक्षेत पारंबी विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनीची जिल्हास्तरावर निवड
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव तर्फे ही परीक्षा दरवर्षी घेण्यात येते नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे सुद्धा गेल्या 14 वर्षापासून गांधी संस्कार परीक्षेचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. शिवचरण उज्जैनकर हे अखंडपणे राबवित आहेत सन 2023. 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी कु. पायल पाखरे ही विद्यार्थिनी जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली होती तिचा जैन हिल्स जळगाव येथे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आला होता सन 2024. 25 या शैक्षणिक वर्षात सुद्धा इयत्ता आठवी इयत्ता नववी व इयत्ता दहावीचे एकूण 60 विद्यार्थी या परीक्षेला बसलेली होती त्यापैकी इयत्ता नववीतील कु. तनुजा नितीन अंदुरकर व कु. जयश्री धम्मपाल धुंदले या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आहेत तर इयत्ता आठवीतील कु. साक्षी श्रीकृष्ण चिम कु. आचल ईश्वर कोळी कु. विद्या विनोद तायडे विद्यालयातून अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत तसेच इयत्ता नववीतील कु.तनुजा नितीन अंदुरकर कु. भावना सुरेश जाधव कु. जयश्री धम्मपाल धुंदले अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत त्याचप्रमाणे इयत्ता दहावीतील कु.स्वाती विजय आंदूरकर कु. रुचिका पद्माकर घाइट आणि कु. प्रीती रामेश्वर गवई अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत या विद्यार्थिनींना व जे या परीक्षेला सहभागी झालेले होते या सर्वांनाच विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा या परीक्षेचे आयोजक सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक श्री एस.डी. ठाकूर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलेले आहे. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री एस. एस. नागे श्री रोहन आठवले श्री अजय इंगळे शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments