रेशनकार्डची ई के वाय सी बाकी असलेल्या कार्डधारकांसाठी कॅम्प चे आयोजन लासूर ता.चोपडा (प्रतिनिधी) (संपादक -:-हेमकांत गायकवाड) येथे रेशनकार्...
रेशनकार्डची ई के वाय सी बाकी असलेल्या कार्डधारकांसाठी कॅम्प चे आयोजन
लासूर ता.चोपडा (प्रतिनिधी)
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
येथे रेशनकार्डची ई के वाय सी बाकी असलेल्या कार्डधारकांसाठी कॅम्प चे आयोजन येथिल इंदिरानगर भागात करण्यात आले होते यावेळी चोपडा तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षक मेघना गरुड मॅडम यांच्या उपस्थितीत सदर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेशनकार्ड ई के वाय सी पेंडीग असलेल्या लाभार्थ्यांनी ई के वाय सी करून घेतली यावेळी येथिल स्वस्त धान्य दुकानदार दिलीप पालीवाल,श्रीमती निर्मला शेलकर,सौ.विद्याबाई बाविस्कर यांच्या सह सेल्समन गजानन पाटील, योगेश जैन, श्रावण बाविस्कर व रेशनकार्ड धारक उपस्थित होते ई के वाय सी बाकी असलेल्या कार्डधारकांसाठी शेवटची तारीख 30 एप्रिल असून त्या अगोदर ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा ई के वाय सी नसलेल्या लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही

No comments