त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर गणपतबारी येथे घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...
त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर गणपतबारी येथे घाणीचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर शहराच्या जवळच गणपतबारी मार्ग प्रवेशद्वार निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो या मार्गाने अनेक भाविक प्रभातफेरी मारण्यासाठी जात असतात तसेच या बारी मध्ये गणपतीचे मंदिर आहे
परंतु गणपतबारीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. गणपतबारीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात घाण टाकले जाते त्यामुळे या घाणीमुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात जव्हार,सेलवास,हरसुल ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात घाणीचा वास येतोय या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये रोश निर्माण होत आहे.
!! प्रतिक्रिया!!
घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. घाणीमुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात. संबंधित प्रशासनाने घाण फेकणाऱ्यांवरती कारवाई करावी व घाणीची विल्हेवाट लावावी.
उत्तम लिलके
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष


No comments