फैजपूर येथे स्वच्छतेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अन्यथा तीव्र उपोषणाचा इशारा :- माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान शेख कुर्बान...
फैजपूर येथे स्वच्छतेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अन्यथा तीव्र उपोषणाचा इशारा :- माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान 
शेख कुर्बान
माजी नगराध्यक्ष
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन तसेच कुशल व अकुशल ठेकेदारी मध्ये मोठा भ्रष्टाचार झाले असून याची कसून चौकशी होणे गरजेचे आहे.
या विषयी वारंवार तक्रार करूनही याची चौकशी का होत नाही असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत असल्या कारणाने यात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे असेच मागील दोन वर्षांत यात जास्त प्रमाणात मोठे घोळ ही झाले असल्याचे तक्रारदार शेख कुर्बान यांचे म्हणणे आहे त्याच प्रमाणे फैजपूर नगरपरिषद मध्ये सार्वजनिक शौचालय देखभाल दुरुस्तीची ही दैनंदिनिय अवस्था असून या स्वच्छतेच्या विविध कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास दि.२१ एप्रिल २०२५ रोजी उपोषणावर बसण्याचा पावित्रा तक्रारदार शेख कुर्बान यांनी घेतला आहे.
No comments