adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंकज समूहातर्फे ईद मिलन: सामाजिक सलोख्याचा संदेश देत विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र..

  पंकज समूहातर्फे ईद मिलन: सामाजिक सलोख्याचा संदेश देत विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र..   चोपडा प्रतिनिधी: (संपादक -:-हेमकांत गायकवाड)     ...

 पंकज समूहातर्फे ईद मिलन: सामाजिक सलोख्याचा संदेश देत विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र..


 चोपडा प्रतिनिधी:

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

    येथील  पंकज समूहाचे अध्यक्ष डॉ.सुरेश बोरोले यांच्या निवासस्थानी ईद-उल-फित्र निमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.


     या विशेष कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी, चोपडा (आय ) काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील, माजी शिक्षक आमदार प्रा. दिलीपराव सोनवणे, डॉ. विकास काका हरताळकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वलटे, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, ॲड. रवींद्र जैन, गिरीश आप्पा पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन, एस बी नाना पाटील, नंदकिशोर पाटील, राजू देशमुख, राजेंद्र ( बिटवा ) पाटील, अरमान अली असगर अली, हनीफ सेठ, आरिफ अहेमद अब्दुल सत्तार, सैफुला सेठ, फिरोज खान महेबूब खान, चिरगोद्दीन इजाबोद्दीन शेख, इस्माईल हाजी हसन तेली, मुख्याध्यापक अब्दुल ह्क सर, जाओद्दीन काजी, नोमान काजी, फरमान मिस्त्री, हारून वायरमन, ऍड असीम वकील ,आसिफ सैय्यद, अनिस महेसर, अशपाक सर, अनिस बोहरी, नुरोद्दीन शेख ,मोईन कुरेशी, सईद अब्दुल लतीफ,  अब्दुल जाफर, शेख साहब ऑपरेटर आंबीद अली, जाकीर दादा, काळू दादा, यासिन मलक, आरिफ सिद्दीकी, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


   याप्रसंगी उपस्थितांनी एकमेकांशी संवाद साधला आणि ईदच्या पवित्र सणाचे महत्त्व विशद केले. विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र आल्याने सामाजिक एकोपा आणि आपुलकीची भावना अधिक दृढ झाली, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. डॉ सुरेश बोरोले , पंकज बोरोले व नारायण बोरोले यांनी सर्वांचे स्वागत केले आणि शुभेच्छा स्वीकारल्या. सदर कार्यक्रम प्रसंगी शीरखुर्माचे आयोजन करण्यात आले होते.

            हा स्नेहमेळावा केवळ शुभेच्छांपर्यंत मर्यादित नव्हता, तर या माध्यमातून  चोपडा शहर व परिसरातील सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील लोकांमध्ये समन्वय आणि सलोखा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ईदच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून एक सकारात्मक आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले, जे निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश राणे, गोकुळ भोळे , रविंद्र अग्रवाल, मनीष पारिख , प्रो आर आर अत्तरदे, एम व्ही पाटील, व्ही आर पाटील, मिलिंद पाटील, केतन माळी , पंकज पाटील आदींनी परिश्रम घेतले....

No comments