adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले एका परिवारात एकच दाखला शासनाने उपलब्ध करून द्यावा नागरिकांची मागणी

  विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले एका परिवारात एकच दाखला शासनाने उपलब्ध करून द्यावा नागरिकांची मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमक...

 विद्यार्थ्यांना लागणारे शालेय दाखले एका परिवारात एकच दाखला शासनाने उपलब्ध करून द्यावा नागरिकांची मागणी

इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रांत कार्यालयातून जात प्रमाणपत्र,नॉन  क्रिमिलियर  व सेंट्रलचा जातीचा दाखला ही सर्व दाखले कागदपत्र जमा केल्यानंतर ऑनलाईन मिळत असतात. या दाखल्यांसाठी  कागदपत्र जमा करताना बरीच धावपळ करावी लागते. वेळेतच ही दाखले विद्यार्थ्यांना मिळतात. एका कुटुंबामध्ये एका व्यक्तीला जर दोन किंवा तीन किंवा चार अपत्य असतील तर त्यांना शैक्षणिक दाखले वेगवेगळे काढावे लागतात. यासाठी वेळही जातो पैसाही जातो धावपळ होते. वरील सर्व कार्यालयातील मिळणारे दाखले हे एका व्यक्तीला दोन, तीन,चार अपत्य जरी असतील तरी प्रत्येक दाखला हा  एकच मिळावा त्यावर सर्वांची नावे असली पाहिजे जेणेकरून अधिकारी कर्मचारी यांना वेळ सुद्धा कमी लागेल  व एकाच दाखल्यावर काम होऊ शकते. ही सुविधा शासनाने  प्रत्येक शासकीय दाखले ज्या ठिकाणी मिळत असतील त्या ठिकाणी एक परिवार एक दाखला सुविधा सुरू करावे अशी  परिसरातील नागरिकांची मागणी आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या विचारात घेता. शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे अधिकचा ताण पडतो.कधी कधी वेळेत दाखला न मिळाल्यास अडचणी निर्माण होतात यासाठी शासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देऊन ही समस्या सोडवून  तसा आदेश कार्यालयांना देण्यात यावे. जेणेकरून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, वैधता प्रमाणपत्र  या दाखल्या वरती एकाच कुटुंबातील एका व्यक्तीला  जेवढे मुलं बाळ असतील त्यांची नावे त्यात समाविष्ट करून देण्यात यावी  अशी मागणी परिसरातील पालकांकडून केली जात आहे. 

प्रतिक्रिया 

 मला एक मुलगा एक मुलगी आहे  दोघांनाही सर्व प्रकारची शासकीय दाखले वेगवेगळी काढावी लागतात. ज्यामुळे पैसाही खर्च होतो वेळही वाया जातो. शासनाने  एकच दाखला दोघांना द्यावा जेणेकरून पुन्हा पुन्हा धावपळ होणार नाही  आणि कामही सुलभ होईल. 


अनिल लढे, उपाध्यक्ष  शिक्षण प्रसारक मंडळ न्हावी ता यावल

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शैक्षणिक दाखले हे मुलांच्या शिक्षणासाठी वेगवेगळे काढावे लागतात. एकाच कुटुंबातील एक व्यक्तीच्या अपत्यांना एकच दाखला मिळाला तर सोयीचे होणार आहे. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले एकाच कुटुंबात उपलब्ध करून द्यावे  


शरद महाजन अध्यक्ष तंत्र व वैद्यक  शिक्षण मंडळ न्हावी मार्ग फैजपूर

No comments