कामाच्या जबाबदाऱ्या व विविध आव्हाने यातून निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी भावी अभियंत्यांनी कलागुणांमध्ये रस घ्यावा -:- प्र...
कामाच्या जबाबदाऱ्या व विविध आव्हाने यातून निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी भावी अभियंत्यांनी कलागुणांमध्ये रस घ्यावा -:- प्राचार्य डॉ.के.जी.पाटील यांचे प्रतिपादन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव 2025 अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झाले. यात प्रामुख्याने ग्रुप डे, ट्रॅडिशनल डे, शेलापागोटे व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्व क्रीडा कार्यक्रम घेण्यात आले या तीन दिवसीय उत्सवात विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंदाची लय लूट केली.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुरुवातीला प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.के.जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अभियांत्रिकीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच आपल्या अंगी असलेले विविध कला गुण जोपासणे सुद्धा तितकेच आवश्यक असते, त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच झळाळी मिळते तसेच आजच्या आधुनिक काळातील अभियंत्या समोर असलेले विविध आव्हाने, कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यातून निर्माण होणारा तणाव सुद्धा व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे असते. व हे विविध कलागुण त्या तणावाचे व्यवस्थापन करायला मदत करतात व आपले आयुष्य आनंदी बनते म्हणून प्रत्येकाने आपल्याला ज्या कलागुणांमध्ये रस आहे त्याला सुद्धा वेळ द्यायला पाहिजे.यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन महाविद्यालयातर्फे गौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सहसचिव शशिकांत चौधरी, संचालक प्रा. एल.व्हीं.बोरोले, नारायण झांबरे, भागवत बोरोले, शरद पाटील तसेच इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य मोजेस जाधव व एन.डी. सोनवणे सर आयटीआयचे प्राचार्य पी.के.फालक, माजी प्राचार्य डॉ आर.डी.पाटील, प्र.प्राचार्य डॉ.के.जी.पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई.चौधरी, डॉ.पी.एम महाजन, तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ डी.ए.वारके , प्रा. डी.आर.पाचपांडे, प्रा. वाय.आर.भोळे, प्रा.ओ.के. फिरके, प्रा मोहिनी चौधरी उपस्थित होते. या उत्सव 2024 च्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा.एम.डी.पाटील, प्रा.सुषमा बेंडाळे, प्रा.स्वप्नाली वाघुळदे, प्रा. रूपाली भारंबे, प्रा.व्ही.व्हि. महाजन प्रयत्न करीत आहे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.


No comments