adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुसुंबा शेतशिवारात पिल्लांसह बिबट्याची भटकंती ? किनगांव डांभुर्णी घटनेची पुनरावृत्ती होण्यापूर्वी वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

  कुसुंबा शेतशिवारात पिल्लांसह बिबट्याची भटकंती ? किनगांव डांभुर्णी घटनेची पुनरावृत्ती होण्यापूर्वी वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी  रावे...

 कुसुंबा शेतशिवारात पिल्लांसह बिबट्याची भटकंती ? किनगांव डांभुर्णी घटनेची पुनरावृत्ती होण्यापूर्वी वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सातपुड्याच्या पायथ्याला लागून असलेल्या रावेर तालुक्यातील कुसुंबा बु. येथील स्मशानभूमी शेजारच्या शेती शिवारात  बिबट्या आपल्या पिल्लांना घेऊन फिरतांना काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांना दिसल्याने कुसूंबासह  परिसरातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे मागील दोन महीन्यात यावल तालुक्यातील डांभूर्णी व किनगांव शेती शिवारात नरभक्षक बिबट्याने दोन बालकांचा बळी घेतला होता तदनंतर वनविभागाने आमदारांनी  संताप व्यक्त केल्यानंतर त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते त्याचप्रमाणे रावेर तालुक्यातील मुंजलवाडी शेतशिवारातील गुरे चराईसाठी बसलेल्या गुराखी अय्युब लालखा तडवी यांच्या एका गायीच्या वासराला बिबट्या ने आपले भक्ष बनवून वासराचा फडशा पाडला होता महीनाभरानंतर पुन्हा रावेर तालुक्यातीलच कुसूंबा गावाजवळील शेतशिवारात केळीच्या बागेत पिल्लांसह बिबट्या भटकंती करताना दिसल्याने शेतमजूर गावकरी व शेतकऱ्यांमधे भीतीचे वातावरण पसरले आहे  परिसरात काही अप्रिय घटना घडण्याआधीच  या बिबट्याला वनविभागाने तात्काळ जेरबंद करुन बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

रावेर तालुक्याच्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कुसुंबा बुद्रुक गावाजवळील शेती शिवारात केळीच्या बागेत बिबट्या काही दिवसांपासून पिल्लांसह गावाजवळील स्मशानभूमी च्या परिसरातील केळीच्या बागेत असल्याची गावकऱ्यांमधे जोरदार चर्चा सुरू असतांनाच कुसुंबा शेती शिवारात बिबट्या पिल्लांना घेऊन फिरतांना दिसून आल्याने शेती कामानिमित्त शेतकरी. मजूरांसह घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या जंगलात प्राण्यांना भक्ष्य, पाणी यांचा अभाव असल्याने गावांकडे येण्याचा प्राण्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. रावेर तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक परिसरातील शेतकरी,शेत मजुर, गावकरी,घटनेकडे वनविभागाच्या आय एफ ओ आर एफ ओ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत जातीने लक्ष देऊन बिबट्याचा पिल्लांसह बिबट्याचा शोध घेऊन तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी रावेर तालुका सह मुंजलवाडी कुसूंबा वासिय नागरिकांकडून करण्यात येत आहे.

No comments