adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अपघातग्रस्तांपैकी कोणी आपलाही असु शकतो सखा !!

  दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा ! चारचाकी चालवताना नको शिटबेल्टशी दुरावा !! श्रीरामपूर आरटीओची अपघातग्रस्तास मदत !  श्रीरामपूर / प्रत...

 दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा !

चारचाकी चालवताना नको शिटबेल्टशी दुरावा !!

श्रीरामपूर आरटीओची अपघातग्रस्तास मदत ! 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.अनंता जोशी हे कार्यक्षेत्रातील आपल्या शासकीय वाहनाने सोनई ते घोडेगांव राज्य महामार्ग क्रमांक ६६ वरुन प्रवास करताना त्यांना एक दुचाकीस्वार गंभीरित्या जखमी अवस्थेत रस्त्यावरती आढळून आला. सदरील दुचाकीस्वराच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याकारणाने  प्रचंड रक्त स्त्राव होत असल्याचे दिसून येताच डेप्युटी आरटीओ अनंता जोशी यांनी तात्काळ आपले वाहन थांबवून उपस्थित नागरिक व वाहन चालक श्री. सावता कातकडे यांच्या मदतीने सदरील अपघातग्रस्तास आपल्या शासकीय वाहनात बसवून जवळील श्री शनेश्वर ग्रामीण रुग्णालय शनिशिंगणापूर याठिकाणी उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे अपघातग्रस्तास तातडीने मदत मिळवून अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात बहुमूल्य मदत झाली. 


याबाबत उपादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यातर्फे सर्व नागरिकांना अपघातग्रस्तास तातडीने मदत करण्याचे आव्हान देखील करण्यात आले, तसेच अपघातग्रस्त दुचाकीस्वाराने जर हेल्मेट परिधान केले असते तर त्यास अजिबात गंभीर इजा झाली नसती करीता दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर केला गेलाच पाहिजे.

असेच मागे एकदा डेप्युटी आरटीओ श्री.अनंता जोशी हे आपल्या शासकीय वाहनाने नाशिक ला महत्वाच्या मिटिंगसाठी जात असताना लोणी -  नांदूर शिंगोटे रस्त्यावर, लोणीच्या पुढे गोगलगांव परिसरात रस्त्याच्या कडेला दुचाकीस्वार दोघे अपघातात गंभीर जखमी झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्या अपघातग्रस्तांना आपल्या शासकीय वाहनाचे वाहन चालक श्री. सावता कातकडे यांच्या मदतीने तात्काळ आपल्या वाहनात बसवून लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट रुग्णालयात दाखल केल्याने त्या अपघातग्रस्तांना वेळेत औषधोपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात मोठी मदत झाली होती, अशाच प्रकारे सर्वच वाहन चालक तथा जनसामान्य नागरीकांनी अपघाताच्या अशा संकट समयी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे धावून आले पाहिजे, कारण अशा कटु प्रसंगी त्या अपघातग्रस्तांना आपल्या मदतीची नितांत आवश्यकता असते. तसेच सर्व नागरिकांनी रस्त्यावर आपली दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणी चारचाकी वाहन चालविताना नेहमी शिटबेल्टचा वापर करावा असे आवाहनही श्रीरामपूर आरटीओतर्फे करण्यात आले.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111

----------------------------------------

अपघातसमयी मदत करा,केवळ दुरुन पाहुन निघून जावू नका !

अपघातग्रस्तांपैकी कोणी आपलाही असु शकतो सखा !!

बहुतांश ठिकाणी आपण बघत असतो की, एखाद्या रस्त्यावर अपघात घडलेला असतो अशा संकट समयी खरे तर प्रत्येकाने त्या अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावून आले पाहिजे,जेणे करुन त्या अपघातग्रस्तास मदत मिळून वेळेत औषधोपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचविण्यात मोठी मोलाची मदत ठरणार असते, मात्र ज्याच्या त्याच्या कामाच्या आणी वेळेच्या अनुषंगाने किंवा नको तसदी म्हणून कोणीही त्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धजावत नाही ही वास्तविकता आहे, परंतु असे न घडता अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी खरे तर सर्वांनी अग्रक्रमाने सामोरे आले पाहिजेत कारण हाच माणूसकीचा सर्वात मोठा धर्म आहे. करीता "अपघातसमयी मदत करा,केवळ दुरुन पाहुन निघून जावू नका, अपघातग्रस्तांपैकी कोणी आपलाही असु शकतो सखा" असे म्हणावेसी वाटते - शब्दांकन शौकतभाई शेख, श्रीरामपूर---------------------------------------

No comments